मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज गोपाळकाला म्हणजेच दहीहंडीचा (Dahihandi 2026) सण अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे. थरांवर थर रचत दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे. मात्र, या उत्सवाच्या उत्साहादरम्यान मानवी मनोरे रचताना दुर्घटना घडून काही गोविंदा जखमी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पालिका व सरकारी रुग्णालयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी १२:०० वाजेपर्यंत शहर आणि उपनगरांत मिळून एकूण २२ गोविंदा जखमी झाले आहेत. सुदैवाने यातील बहुतांश गोविंदांना किरकोळ दुखापत झाली असून २१ जणांवर वेळेत उपचार करून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
https://www.prahaar.in/2026/09/05/bogus-call-center-busted-in-malad-%e2%82%b914-lakh-fraud-under-the-guise-of-an-e-commerce-franchise-case-registered-against-19-individuals/
विभागनिहाय रुग्णालयांची आकडेवारी (दुपारी १२ वाजेपर्यंत):
मुंबई शहर भाग (City Hospitals):
एकूण जखमी: २०
उपचार सुरू असलेले: ००
डिस्चार्ज दिलेले: २०
(शहर भागातील सर्व २० जखमी गोविंदांवर प्राथमिक उपचार करून त्यांना सुरक्षितपणे घरी सोडण्यात आले आहे.)
पूर्व उपनगर (Eastern Suburbs Hospitals):
एकूण जखमी: ०१
उपचार सुरू असलेले: ००
डिस्चार्ज दिलेले: ०१
पश्चिम उपनगर (Western Suburbs Hospitals):
एकूण जखमी : ०१
उपचार सुरू असलेले : ०१
डिस्चार्ज दिलेले : ००
एकूण परिस्थिती
आज दुपारी १२ वाजेपर्यंत नोंदवलेल्या आकडेवारीनुसार एकूण २२ जखमींपैकी तब्बल २१ गोविंदांना डिस्चार्ज मिळाला आहे, तर सध्या केवळ ०१ गोविंदावर पश्चिम उपनगरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी गोविंदाची प्रकृती स्थिर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. प्रशासनाने आणि पालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये आपत्कालीन वैद्यकीय सुविधा आणि डॉक्टर तैनात ठेवले आहेत. सुरक्षा नियमांचे पालन करून आणि प्रथमोपचाराची व्यवस्था सोबत ठेवूनच मानवी मनोरे रचावेत, असे आवाहन प्रशासनाकडून गोविंदा पथकांना करण्यात येत आहे.
विविध शासकीय आणि (BMC) रुग्णालयांकडून दुपारी १५:०० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या जखमी गोविंदांची माहिती
मध्य मुंबईतील रुग्णालये (CT Hospitals):
जखमी – २९
उपचार सुरू – ०४
डिस्चार्ज – २५
पूर्व उपनगरातील रुग्णालये (ES Hospitals):
जखमी – ०२
उपचार सुरू – ००
डिस्चार्ज – ०२
पश्चिम उपनगरातील रुग्णालये (WS Hospitals):
जखमी – ०१
उपचार सुरू – ००
डिस्चार्ज – ०१
एकूण: जखमी – ३२; उपचार सुरू – ४; डिस्चार्ज – २८
मिळालेल्या माहितीनुसार, अद्याप कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही.
विविध सरकारी आणि BMC रुग्णालयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी ६ वाजेपर्यंतची माहिती
- एकूण जखमी: ११८
- रुग्णालयात दाखल: ५
- उपचार सुरू: ८०
- डिस्चार्ज: ३३
रुग्णालयनिहाय माहिती :
- केईएम: २९ जखमी ,१४ उपचाराधीन ,१५ डिस्चार्ज
- नायर: १७ जखमी , १७ डिस्चार्ज
- राजवाडी: १३ जखमी , ४ दाखल , ४ उपचाराधीन , ५ डिस्चार्ज
- पोतदार: ११ जखमी , ११ उपचाराधीन
- हिंदूजा: ८ जखमी , ८ उपचाराधीन
- सायन: ७ जखमी , ७ डिस्चार्ज
मुंबईतील गोविंदा उत्सवादरम्यान ११८ जखमी; ८० जणांवर उपचार सुरू
विविध सरकारी आणि बीएमसी (BMC) रुग्णालयांकडून जखमी गोविंदांबाबत रात्री ९:०० वाजेपर्यंत प्राप्त झालेली माहिती
• एकूण जखमी: १६८
• रुग्णालयात दाखल: २९
• उपचार सुरू: ८१
• डिस्चार्ज: ५८
रुग्णालयनिहाय माहिती :
• केईएम: ३३ जखमी, ६ दाखल, १२ उपचाराधीन, १५ डिस्चार्ज
• नायर: १७ जखमी, ४ दाखल, १३ उपचाराधीन, ० डिस्चार्ज
• राजावाडी: २० जखमी, ६ दाखल, ५ उपचाराधीन, ९ डिस्चार्ज
• पोतदार: १६ जखमी, ० उपचाराधीन, १६ डिस्चार्ज
• हिंदुजा: १४ जखमी, २ दाखल, १२ उपचाराधीन, ० डिस्चार्ज
• सायन: ८ जखमी, ४ दाखल, ४ उपचाराधीन, ० डिस्चार्ज
• BDBA हॉस्पिटल: १३ जखमी, २ दाखल, ४ उपचाराधीन, ७ डिस्चार्ज