मुंबई : बॉलिवूडमधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट २१ जानेवारी २०२७ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. (Love and War)
या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे, रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल हे तिन्ही कलाकार पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे या त्रिकुटाला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. दरम्यान, ‘लव्ह अँड वॉर’चं शूटिंग पूर्ण झालं असून आता दिग्दर्शक संजय लीला भन्साळी पोस्ट-प्रॉडक्शनच्या कामावर लक्ष केंद्रित करणार आहेत. चित्रपटाची निर्मिती भन्साळी प्रॉडक्शन्सकडून करण्यात आली आहे. (Love and War)
https://www.prahaar.in/2026/09/04/priyanka-chopra-jonas-lvmh-prize-karl-lagerfeld-prize-2026/
हा चित्रपट भन्साळींच्या भव्य चित्रपटांपैकी एक मानला जात असून, त्यात प्रेम आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवरची कथा पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रणबीर-आलिया-विकीचं त्रिकूट पाहायला मिळणार असल्याने बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. ‘लव्ह अँड वॉर’ची घोषणा २०२४ मध्ये करण्यात आली होती. आता शूटिंग पूर्ण झाल्याने चित्रपटाच्या प्रमोशनकडे आणि पुढील अपडेट्सकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. (Love and War)