Home ब्रेकिंग न्यूज Bharat Gogawale : सप्टेंबर संपण्याआधी महामंडळांचे वाटप होईल!

Bharat Gogawale : सप्टेंबर संपण्याआधी महामंडळांचे वाटप होईल!

0
Bharat Gogawale : सप्टेंबर संपण्याआधी महामंडळांचे वाटप होईल!

– मंत्री भरत गोगावले; रोजगार हमी योजनेचे केंद्राकडे ३ हजार कोटी रुपये रखडल्याची माहिती

मुंबई : सप्टेंबर महिना संपण्यापूर्वी राज्यातील महामंडळांचे वाटप पूर्ण होईल, अशी माहिती मंत्री भरत गोगावले यांनी शुक्रवारी दिली. महामंडळ वाटपाबाबत नेत्यांमध्ये पूर्ण एकमत असून, समन्वय समितीची बैठक पार पडल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी आले असता माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले.

https://www.prahaar.in/2026/09/04/scrap-worthy-rickshaws-must-not-be-seen-on-the-roads-conduct-a-special-drive-until-october-5-and-take-strict-action-against-non-compliant-rickshaws-that-endanger-passengers-lives/

मराठा आरक्षणाबाबत विखे पाटील यांनी मांडलेल्या भूमिकेविषयी विचारले असता गोगावले म्हणाले, शरद पवार यांनी भूतकाळात मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यायला हवे होते. तेव्हाच हे झाले असते, तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. तसेच, जरांगे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भात बोलताना, कायद्याच्या चौकटीत राहून तज्ज्ञ मंडळी हैदराबाद आणि सातारा गॅझेटची कसून तपासणी करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

https://www.prahaar.in/2026/09/04/mumbai-auto-taxi-drivers-nivrutti-sanman-yojana-10000-rupees-benefit-and-education-grant/

दरम्यान, रोजगार हमी योजनेच्या ठेकेदारांच्या प्रलंबित बिलांवर भाष्य करताना गोगावले म्हणाले की, रोहयोची सुमारे ३ हजार कोटी रुपयांची रक्कम केंद्राकडे रखडली आहे. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडून ही रक्कम लवकरच महाराष्ट्राला प्राप्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही निधी प्राप्त झाल्यानंतर अनेक योजनांमधील प्रलंबित देयके चुकती केली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.