मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मागील काही दिवसांपासून मुंबईतील महापालिकेतील भाजपच्या नेत्यांमध्ये वाद निर्माण करून आग लावण्याचा प्रयत्न प्रसार माध्यमांद्वारे केला जात असून यावर अखेर महापौर आणि शिक्षण समिती अध्यक्षांनी पडदा पाडला. महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी माध्यमांसमोर एकमेकांना जिलेबी भरवून जिलेबीच्या या साखरेच्या पाकाच्या गोड्व्याप्रमाणे आमच्यातील मैत्रीचा गोडवा अखंड आहे आणि राहील. माध्यमांनी आमच्या कुटुता कशी निर्माण होईल यासाठी प्रयत्न केला असला तरी आमच्यात कटुता नाही आणि होणारही नाही,असेही त्यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.
https://www.prahaar.in/2026/09/04/fines-totaling-31-64-lakh-recovered-over-five-months-in-cases-of-unauthorized-construction-action-taken-against-5256-individuals-under-new-sanitation-bylaws/
मुंबई महापालिका मुख्यालयात आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारासाठी ५० शिक्षकांची नावे जाहीर केल्यानंतर महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी येथील उपहारगृहातील स्वच्छतेची पाहणी केली. यावेळी उपहार गृहाची पाहणी करत असतानाच तेथील जिलेबी एकमेकांना भरवून आपल्यात कितीही माध्यमांनी कटुता असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला असला तरी आमच्यात कोणत्याही प्रकारची कुटुता नसून मैत्रीचा गोडवा अतुट असल्याचे सांगितले.
https://www.prahaar.in/2026/09/04/mayors-award-for-50-exemplary-teachers-from-municipal-and-private-schools-mayor-ritu-tawde-announced-the-names-of-the-award-winners/
काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागातील तज्ज्ञ व्यक्तीची नियुक्ती करण्यावरून महापौरांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि शिरवडकर यांनी दिलेली प्रतिक्रिया यामुळे या दोघांमधील वाद निर्माण झाल्याचे चित्र माध्यमांनी निर्माण केले होते. त्यानंतर भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या समोरही चार भिंतीच्या आतील बातमी प्रसिध्द करत तावडे आणि शिरवडकर यांच्या साटम यांच्यासमोरच जुंपल्याच्याही बातम्या रंगल्या होत्या. त्यावर अखेर पडदा पाडण्यात आला आहे.