Home क्रीडा BCCI Clarification : रोहित शर्माच्या टीम इंडियातील स्थानाला धोका नाही; बीसीसीआय सचिवांकडून अफवांना पूर्णविराम

BCCI Clarification : रोहित शर्माच्या टीम इंडियातील स्थानाला धोका नाही; बीसीसीआय सचिवांकडून अफवांना पूर्णविराम

0
BCCI Clarification : रोहित शर्माच्या टीम इंडियातील स्थानाला धोका नाही; बीसीसीआय सचिवांकडून अफवांना पूर्णविराम
Rohit Sharma's place in Team India is not at risk

मुंबई : भारताचा दिग्गज फलंदाज रोहित शर्माला वनडे संघात स्थान देण्याबाबत काही दिवसांपासून प्रश्न उपस्थित होत आहेत. रोहित 2027 च्या विश्वचषकात खेळताना चाहत्यांना पाहता येणार नाही. मात्र, आता या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.

https://www.prahaar.in/2026/09/03/vvs-laxman-to-coach-the-indian-mens-cricket-team-at-the-asian-games/

रोहित शर्माच्या बाबतीत सद्यस्थिती कायम आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) स्पष्ट केले आहे की, या माजी कर्णधाराच्या टीम इंडियातील स्थानाला कोणताही तात्काळ धोका नाही. विशेषतः २०२७ च्या विश्वचषकातील सहभागाबाबत मोठ्या प्रमाणावर तर्कवितर्क लावले जात आहेत. बैठकीनंतर रोहित शर्माच्या भविष्याबद्दल माहिती देताना बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया म्हणाले की, “रोहित शर्मा प्रत्येक सामन्यात उत्कृष्ट खेळत आहे. यापेक्षा अधिक काय हवे? रोहितने मागच्या सामन्यात १३८ धावा देखील केल्या होत्या. मग अशा अफवा का पसरवल्या जात आहेत?.”

या बैठकीला भारताचे दोन कर्णधार म्हणजेच शुभमन गिल (कसोटी आणि एकदिवसीय सामने) आणि श्रेयस अय्यर (टी-२० सामने) उपस्थित होते. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चे (सीओई) प्रमुख व्ही.व्ही.एस. लक्ष्मण हे देखील यावेळी उपस्थित होते. मात्र, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. ते मुंबईबाहेर होते त्यामुळे ते या बैठकीला हजर राहू शकले नाहीत.

https://www.prahaar.in/2026/09/03/yashvir-singh-gets-the-opportunity-to-replace-the-injured-neeraj-chopra-for-the-asian-games/

बीसीसीआयच्या सचिवांनी लक्ष्मण यांचा ‘क्रिकेट संचालक’ अशा नवीन भूमिकेसाठी विचार केला जात असल्याच्या चर्चाही फेटाळून लावल्या. तसेच, आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीमध्ये कोणताही तात्काळ बदल केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.