Home महाराष्ट्र अहिल्यानगर Ahilyanagar News : पोलिसांकडून नशिल्या इंजेक्शचा साठा जप्त; तीन कारवायांत गांजासह पदार्थांसह ३.५ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

Ahilyanagar News : पोलिसांकडून नशिल्या इंजेक्शचा साठा जप्त; तीन कारवायांत गांजासह पदार्थांसह ३.५ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

0
Ahilyanagar News : पोलिसांकडून नशिल्या इंजेक्शचा साठा जप्त; तीन कारवायांत गांजासह पदार्थांसह ३.५ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : कोतवाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने शहरात वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाई करत एकाच दिवसात तीन मोठे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत पोलिसांनी नशिल्या औषधांची विक्री, गांजाची अवैध शेती आणि मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

https://www.prahaar.in/2026/09/03/entry-banned-at-orchid-city-center-mall-municipal-corporation-issues-notice-to-all-unit-holders-and-shop-owners/

पहिल्या कारवाईत, गांधी मैदान परिसरात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मेफेनटरमाईन सल्फेट या नशेसाठीही वापर होणाऱ्या औषधाची विक्री करणाऱ्या प्रताप अशोक अकोलकर (वय २१, रा. करंजी), तेजस गंगाधर वारुळे (वय २१) व तेजस अमित उळागड्डे (वय २२, दोघे रा. अहिल्यानगर) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून १ लाख १५ हजार रुपये किमतीच्या ४० औषधांच्या बाटल्या आणि २० हजार रुपयांची दुचाकी असा एकूण एक लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या बाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या कारवाईत केडगाव येथील वैष्णवनगर भागात विनापरवाना गांजाचे झाड लावून विक्री करणाऱ्या विकास बाळू उमाप (वय ३५) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून १८.२५ किग्रॅ वजनाचे आणि १ लाख ८२ हजार ५०० रुपये किमतीचे गांजाचे झाड हस्तगत करून एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तिसऱ्या प्रकरणात पुणे बसस्थानकातून चोरीस गेलेला ७८ हजार रुपयांचा मोबाईल सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोधून मोहम्मद इम्रान मोहम्मद जुबेर शेख (वय २१, रा. साहेबतगंज, झारखंड) याला ताब्यात घेण्यात आले. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप टिपरासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक कुणाल सपकाळे, पोलिस उपनिरीक्षक गणेश देशमुख व गुन्हे शोध पथकाने ही यशस्वी कारवाई केली.