मुंबई : मुंबईतील माटुंगा येथील SNDT कॉलेजशी संबंधित एका कराटे प्रशिक्षकावर अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी कुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी २ सप्टेंबरच्या रात्री संबंधित प्रशिक्षकाला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
https://www.prahaar.in/2026/09/03/an-effort-to-steer-ganeshotsav-towards-traditional-practices/
दरम्यान, या प्रकरणात अल्पवयीन मुलीशी संबंधित माहिती गोपनीय ठेवण्यात येत आहे. आरोपांची सत्यता तपासण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक प्रक्रिया आणि तपास केला जात आहे. त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत संबंधित व्यक्तीविरोधातील आरोपांना अंतिम सत्य मानता येणार नाही. या प्रकरणात पुढे कोणती कायदेशीर कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.
https://www.prahaar.in/2026/09/03/ahilyanagar-kharif-crops-across-five-lakh-hectares-in-ahilyanagar-are-in-jeopardy/
चुनाभट्टी-सायनमध्येही कराटे क्लासेस
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी एसएनडीटी कॉलेमध्ये कराटे प्रशिक्षक म्हणून कार्यरत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. याशिवाय तो चुनाभट्टी आणि सायन परिसरात स्वतंत्रपणे कराटे क्लासेसही चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रशिक्षण केंद्रांबाबतही पोलिसांकडून तपास केला जात आहे.
आरोपीकडून यापूर्वी कोणत्याही प्रकारच्या तक्रारी किंवा गैरप्रकाराची नोंद झाली आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासण्यासाठी पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू असून, त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.