Home क्रीडा Team India : अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, अय्यर कर्णधार; बुमराह, सॅमसन, सूर्यवंशीला संधी

Team India : अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, अय्यर कर्णधार; बुमराह, सॅमसन, सूर्यवंशीला संधी

0
Team India : अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, अय्यर कर्णधार; बुमराह, सॅमसन, सूर्यवंशीला संधी

नवी दिल्ली : अफगाणिस्तानविरुद्ध सप्टेंबरमध्ये होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील १५ सदस्यीय संघात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, बुमराहसह चार खेळाडूंना मालिकेपूर्वी तंदुरुस्ती चाचणी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्यक्ष सहभागाबाबत तंदुरुस्ती चाचणीनंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

https://www.prahaar.in/2026/09/01/siddhesh-lad-takes-over-the-reins-of-mumbais-captaincy/

संघातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनच्या पुनरागमनाचा. झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर राहिल्यानंतर सॅमसनला पुन्हा भारतीय संघात स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीचीही संघात निवड झाली आहे. झिम्बाब्वे दौऱ्यात वैभवने दमदार फलंदाजी करत मालिकावीराचा पुरस्कार पटकावला होता.

https://www.prahaar.in/2026/09/01/duleep-trophy-vaibhav-sooryavanshi-vaibhav-sooryavanshi-missed-out-on-a-century-by-just-8-runs-lost-the-chance-to-break-record-held-by-sachin/

भारतीय संघात जसप्रीत बुमराह, नीतीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा यांच्यासमोर तंदुरुस्तीची कसोटी आहे. दुखापतीमुळे हे खेळाडू गेल्या काही काळापासून मैदानापासून दूर होते. त्यामुळे मालिकेपूर्वी तंदुरुस्ती चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतरच त्यांना खेळता येणार आहे. बुमराहने इंग्लंड दौऱ्यानंतर अद्याप कोणताही सामना खेळलेला नाही. हर्षित राणा आणि नीतीश कुमार रेड्डी हे देखील दुखापतीतून सावरत आहेत. वॉशिंग्टन सुंदरलाही दुखापतीमुळे श्रीलंका दौऱ्याला मुकावे लागले होते.

https://www.prahaar.in/2026/08/31/lionel-messi-announces-retirement-from-international-football/

अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी झिम्बाब्वे दौऱ्यात भारतीय संघाचा भाग असलेल्या आठ खेळाडूंना वगळण्यात आले आहे. यामध्ये रिंकू सिंह, प्रिन्स यादव, अशोक शर्मा, मयंक यादव, सूर्यांश शेडगे, यश ठाकूर, प्रभसिमरन सिंह आणि हर्ष दुबे यांचा समावेश आहे. झिम्बाब्वे दौऱ्यात यश ठाकूर आणि अशोक शर्मा यांनी भारताकडून पदार्पण केले होते, तर प्रिन्स यादव दुखापतग्रस्त झाला होता.

https://www.prahaar.in/2026/08/31/tiwana-football-club-team-tiwana-triumphs-at-the-neville-dsouza-football-ground-in-bandra-clinching-the-mumbai-football-association-first-division-2026-title/

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिन्ही टी-२० सामने दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर खेळवण्यात येणार आहेत. मालिकेतील पहिला सामना १३ सप्टेंबर, दुसरा सामना १५ सप्टेंबर, तर तिसरा आणि अखेरचा सामना १७ सप्टेंबर रोजी होईल. विशेष म्हणजे सामने भारतात होत असले तरी मालिकेचे यजमानपद अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाकडे आहे.