Home ब्रेकिंग न्यूज Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

0
Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी
Speeding Innova runs over boy in Mumbai; vehicle driven over the child's chest.

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा अपघात झाला. अपघाताचे वृत्त कळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी जखमी झालेल्या लहान मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल केले. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. डॉक्टरांनी तपासणी करून मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. अपघात प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

https://prahaar.in/2026/08/30/accident-on-mumbai-goa-highway-vehicle-plunges-into-25-foot-deep-ditch-after-hitting-two-girls/

मुंबईच्या वांद्रे भागात इनोव्हा कारचा अपघात झाला. एक महिला चालक ही गाडी चालवत होती. ती भरधाव वेगाने गाडी पळवत होती. मोबाईलवर बोलत गाडी चालवत असलेल्या महिलेमुळे अपघात झाला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली.

https://prahaar.in/2026/08/30/tamil-nadu-governments-decision-security-cover-for-former-chief-minister-stalin-reduced/

चालक महिलेला गाडीसमोर कोणी आहे हे लक्षात आले नाही आणि तिने नऊ वर्षांच्या मुलाला उडवले. धक्कादायक म्हणजे मुलाच्या छातीवर इनोव्हाचे चाक आले पण महिलेला ही बाब लक्षात आली नव्हती. ज्यांनी अपघात बघितला त्यांनी आरडाओरडा केल्यावर महिलेने गाडी चालवणे थांबवले.

https://prahaar.in/2026/08/30/the-double-engine-government-stands-firmly-behind-farmers-women-and-the-youth-deputy-chief-minister-eknath-shinde/

अपघातात मुलाचा मृत्यू झाला असून पोलिसांनी चालक व्यक्ती विरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.