Home ताज्या घडामोडी Vishwa Hindu Parishad : दुर्गापूजा मंडपांमध्ये मांसाहारी पदार्थ टाळण्याचे विहिंपचे आवाहन

Vishwa Hindu Parishad : दुर्गापूजा मंडपांमध्ये मांसाहारी पदार्थ टाळण्याचे विहिंपचे आवाहन

0
Vishwa Hindu Parishad : दुर्गापूजा मंडपांमध्ये मांसाहारी पदार्थ टाळण्याचे विहिंपचे आवाहन
VHP appeals to avoid non-meat in Durga Puja mandaps

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेकडून (विहिंप) पूजा आयोजकांसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. दुर्गापूजा मंडपांमध्ये मांसाहारी खाद्यपदार्थांची विक्री किंवा सेवन टाळावे, तसेच मंडपाची पवित्रता आणि स्वच्छता कायम राखावी, असे आवाहन विहिंपने केले आहे. पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेच्या काळात मांसाहारी खाद्यपदार्थांवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी विहिंपने केलेली नसल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. मात्र, पूजा मंडपाच्या परिसरात मांसाहारी पदार्थांची विक्री किंवा सेवन होऊ नये, अशी संघटनेची भूमिका आहे. मांसाहारी खाद्यपदार्थांची विक्री करणे आवश्यक असल्यास मंडपापासून दूर, निश्चित केलेल्या ठिकाणी त्याची व्यवस्था करावी, असे विहिंपने म्हटले आहे.

https://prahaar.in/2026/08/29/minor-girl-forcibly-taken-away-on-a-two-wheeler-subjected-to-misconduct-and-death-threats/

देवीच्या मूर्तीचा मांसाहारी खाद्यपदार्थांशी कोणत्याही प्रकारे संपर्क होऊ नये, तसेच मंडपाची स्वच्छता आणि धार्मिक पवित्रता अबाधित राहावी, हा या सूचनांमागील उद्देश असल्याचे विहिंपने सांगितले. पश्चिम बंगालमधील दुर्गापूजेची परंपरा पूर्णपणे शाकाहारी राहिलेली नसल्याने उत्सवादरम्यान मांसाहारी भोजनावर संपूर्ण बंदीची मागणी केली जात नसल्याचेही संघटनेने स्पष्ट केले.

https://prahaar.in/2026/08/29/prime-minister-modi-departs-for-visits-to-uzbekistan-and-kyrgyzstan/

याबाबत निर्गुणानंद यांनी सांगितले की, देवीच्या मूर्तीची पवित्रता जपणे आणि पूजा मंडपाच्या आत तसेच परिसरात स्वच्छता व पावित्र्य राखणे हे सनातन्यांचे कर्तव्य आहे. मांसाहारी खाद्यपदार्थांची विक्री करायची असल्यास ती पूजा मंडपाबाहेर निश्चित केलेल्या ठिकाणीच करावी, जेणेकरून खाद्यपदार्थांचा कचरा मंडपाच्या परिसरात पोहोचणार नाही, असे त्यांनी नमूद केले. पूजा समित्यांनी देवीच्या मूर्तीची पवित्रता आणि मंडपाची स्वच्छता राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या नाहीत, तर विहिंपला हस्तक्षेप करावा लागू शकतो, असा इशाराही संघटनेने दिला आहे