Home क्रीडा Kedar Jadhav : क्रिकेटच्या पिचवरून राजकारणाच्या मैदानात; केदार जाधवला भाजपमध्ये मिळाली मोठी जबाबदारी!

Kedar Jadhav : क्रिकेटच्या पिचवरून राजकारणाच्या मैदानात; केदार जाधवला भाजपमध्ये मिळाली मोठी जबाबदारी!

0
Kedar Jadhav : क्रिकेटच्या पिचवरून राजकारणाच्या मैदानात; केदार जाधवला भाजपमध्ये मिळाली मोठी जबाबदारी!
Kedar Jadhav gets a major responsibility in the BJP

Mumbai : टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव आता राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एका नव्या भूमिकेत झळकणार आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP) केदार जाधव यांच्यावर एक मोठी जबाबदारी सोपवली असून, त्यांची पक्षाच्या क्रीडा प्रकोष्ठ प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज अधिकृतपणे या नियुक्त्यांची घोषणा केली आहे.

https://prahaar.in/2026/08/25/efforts-will-be-made-to-include-dahi-handi-in-the-olympics/

नुकतीच भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत प्रदेश सरचिटणीस निरंजन डावखरे, योगेश सागर, माधवीताई नाईक, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष योगेश टिळेकर, आमदार गोपीचंद पडळकर आणि राजेश पांडे यांच्यासह पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. याच बैठकीदरम्यान भाजप प्रदेशाध्यक्षांनी पक्षाच्या विविध प्रदेश प्रकोष्ठ प्रभारी आणि सहप्रभारी यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या, ज्यामध्ये केदार जाधव यांच्या नावाचा विशेष समावेश आहे.

https://prahaar.in/2026/08/25/marathi-language-department-mandatory-in-self-financed-universities-chandrakant-patil-reviews-effective-implementation-of-nep/

गेल्या वर्षी ८ एप्रिल २०२५ रोजी तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केदार जाधवने अधिकृतपणे भाजपमध्ये पक्षप्रवेश केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातून प्रेरणा घेऊन आपण पक्षात प्रवेश करत असल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. आता पक्षात क्रीडा प्रकोष्ठ पदाची धुरा मिळाल्यामुळे खेळाडूंना प्रोत्साहन देणे आणि खेळाशी संबंधित योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आहे. क्रीडा विश्वात भारताचे नाव उज्ज्वल केल्यानंतर, आता क्रिकेटच्या मैदानावरील हा ‘स्टार’ खेळाडू राजकारणाच्या पिचवर कशी कामगिरी बजावतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या नव्या नियुक्तीमुळे क्रीडा क्षेत्रातूनही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.