Home साप्ताहिक अर्थविश्व Gold Silver Price Hike : सोन्या-चांदीच्या भावात तुफान तेजी! आजच खरेदी करणार असाल तर थांबा; जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price Hike : सोन्या-चांदीच्या भावात तुफान तेजी! आजच खरेदी करणार असाल तर थांबा; जाणून घ्या आजचे दर

0
Gold Silver Price Hike : सोन्या-चांदीच्या भावात तुफान तेजी! आजच खरेदी करणार असाल तर थांबा; जाणून घ्या आजचे दर
Gold Silver Price Hike

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. अमेरिकन डॉलर आणि बॉंड यील्डमध्ये झालेली घसरण, तसेच जागतिक बाजारातील वाढती अस्थिरता यामुळे गुंतवणूकदारांचा कल सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढला आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमतींना मोठा आधार मिळाला आहे. दरम्यान, चांदीच्या दरातही वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

https://prahaar.in/2026/08/22/national-teachers-awards-announced-48-teachers-selected-nationwide-four-teachers-from-maharashtra-included/

आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1,520 रुपयांची वाढ झाली असून, 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,63,090 रुपयांवर पोहोचला आहे.

24 कॅरेट सोन्याचे आजचे दर

  • 1 ग्रॅम – 16,309 रुपये
  • 8 ग्रॅम – 1,30,472 रुपये
  • 10 ग्रॅम – 1,63,090 रुपये
  • 100 ग्रॅम – 16,30,900 रुपये

22 कॅरेट सोन्याचे आजचे दर

  • 1 ग्रॅम – 14,950 रुपये
  • 8 ग्रॅम – 1,19,600 रुपये
  • 10 ग्रॅम – 1,49,500 रुपये
  • 100 ग्रॅम – 14,95,000 रुपये

18 कॅरेट सोन्याचे आजचे दर

  • 1 ग्रॅम – 12,232 रुपये
  • 8 ग्रॅम – 97,856 रुपये
  • 10 ग्रॅम – 1,22,320 रुपये
  • 100 ग्रॅम – 12,23,200 रुपये

चांदीचा आजचा भाव

सोन्यासोबत चांदीच्या दरातही तेजी पाहायला मिळत आहे.

  • 1 ग्रॅम – 260 रुपये
  • 8 ग्रॅम – 2,080 रुपये
  • 10 ग्रॅम – 2,600 रुपये
  • 100 ग्रॅम – 26,000 रुपये
  • 1 किलो – 2,60,000 रुपये

दरम्यान, अमेरिकेतील आर्थिक घडामोडी आणि जागतिक पातळीवरील भू-राजकीय तणावामुळे कमोडिटी बाजारात चढ-उतार कायम आहेत. त्यामुळे आगामी काळात सोने-चांदीच्या दरात आणखी बदल होण्याची शक्यता आहे.