Home देश Amit Shah On Vande Mataram : “काँग्रेसला लाज वाटली पाहिजे!” ‘वंदे मातरम’वरून अमित शाहांचा हल्लाबोल!

Amit Shah On Vande Mataram : “काँग्रेसला लाज वाटली पाहिजे!” ‘वंदे मातरम’वरून अमित शाहांचा हल्लाबोल!

0
Amit Shah On Vande Mataram : “काँग्रेसला लाज वाटली पाहिजे!” ‘वंदे मातरम’वरून अमित शाहांचा हल्लाबोल!
Amit Shah

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी सरकारी कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम’ गायनाच्या नियमांचे पालन न करण्याच्या निर्णयावरून काँग्रेसवर अत्यंत कडक शब्दांत टीका केली आहे. काँग्रेसचे हे धोरण केवळ तुष्टीकरणाचे राजकारण असून, यामुळे देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांचा आणि स्वातंत्र्यसैनिकांचा अनादर होत असल्याचा गंभीर आरोप शाह यांनी केला आहे.

https://prahaar.in/2026/08/20/martin-day-and-nithin-chands-guruvayur-wedding-a-decade-long-wish-fulfilled-scottish-mp-martin-day-had-a-traditional-temple-wedding-with-keralas-nithin-chand/

अमित शाह यांनी इतिहास उकरून काढत असा दावा केला की, १९३७ मध्ये काँग्रेसने मुस्लिमांचे लांगूलचालन करण्यासाठी ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताचे दोन भाग केले होते. त्यांच्या मते, काँग्रेसच्या याच भूमिकेने पुढे जाऊन देशाच्या फाळणीची पायाभरणी केली आणि ‘द्वि-राष्ट्र सिद्धांताला’ बळ दिले, ज्याचा अंतिम परिणाम म्हणजे भारताचे विभाजन होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली. गृहमंत्री पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ही जुनी ऐतिहासिक चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘वंदे मातरम’च्या १५० व्या जयंतीनिमित्त संपूर्ण राष्ट्रगीत गाऊन राष्ट्रीय एकतेला अधिक मजबूत करण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.