Home क्राईम UP Crime News : प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला अन् प्रियकराने मित्रांसोबत मिळून रचला भयानक खेळ; उत्तर प्रदेश हादरले!

UP Crime News : प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला अन् प्रियकराने मित्रांसोबत मिळून रचला भयानक खेळ; उत्तर प्रदेश हादरले!

0
UP Crime News : प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला अन् प्रियकराने मित्रांसोबत मिळून रचला भयानक खेळ; उत्तर प्रदेश हादरले!
Raigad Crime

उत्तर प्रदेश : विश्वासाला काळिमा फासणारी आणि मन सुन्न करणारी एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खेरी येथून समोर आली आहे. ज्या प्रियकरावर डोळे झाकून विश्वास ठेवला, त्यानेच मित्रांसोबत मिळून आपल्या प्रेयसीचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. १५ ऑगस्ट रोजी वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने घरी बोलावून एका २० वर्षीय तरुणीवर तिच्या प्रियकराने आणि त्याच्या दोन मित्रांनी सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या २४ तासांत मुख्य आरोपी प्रियकरासह तिन्ही नराधमांच्या आवळल्या आहेत.

वाढदिवसाचा केक कापला अन् घडला भयंकर प्रकार

https://prahaar.in/2026/08/17/nitin-gadkari-pune-chhatrapati-sambhajinagar-highway-project-mumbau-bengluru-expressway-maharashtra-infrastructure/

मिळालेल्या माहितीनुसार, मूळची सीतापूर येथील रहिवासी असलेली पीडित तरुणी लखीमपूर येथील तिच्या आजीच्या घरी राहण्यासाठी आली होती. १५ ऑगस्ट रोजी तिचा वाढदिवस असल्याने, शेजारीच राहणारा तिचा प्रियकर सिद्धार्थ श्रीवास्तव याने तिला वाढदिवस साजरा करण्यासाठी आपल्या घरी बोलावले. पीडिता त्याच्या घरी पोहोचली असता, तिथे सिद्धार्थचे दोन मित्र – मधुरेश मिश्रा आणि विष्णू कनौजिया हे आधीपासूनच हजर होते. सुरुवातीला सर्वांनी मिळून अतिशय आनंदाने वाढदिवसाचा केक कापला. मात्र, त्यानंतर आरोपींचे खरे रूप समोर आले. केक कापल्यानंतर सिद्धार्थ आणि त्याच्या दोन्ही मित्रांनी आळीपाळीने तरुणीवर अत्याचार केले. या अमानुष कृत्यानंतर पीडितेला रक्तबंबाळ आणि अत्यंत गंभीर अवस्थेत खोलीत सोडून तिन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

किंकाळ्या ऐकून नागरिक धावले; पोलिसांची धडक कारवाई

पीडित तरुणीच्या वेदनादायी किंकाळ्या ऐकून शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच सदर कोतवाली पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पीडितेला तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. लखीमपूर शहर पोलीस आयुक्त विवेक तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आणि आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना केली. १६ ऑगस्ट रोजी रात्री पोलिसांनी मुख्य आरोपी सिद्धार्थ श्रीवास्तव, मधुरेश मिश्रा आणि विष्णू कनौजिया या तिघांनाही बेड्या ठोकल्या. याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.