नाशिक : अध्यात्मिक शहर अशी ओळख मिरवणाऱ्या नाशिकमध्ये रविवारी गोळीबाराची घटना घडली. नाशिक रोडच्या गोसावी वाडीतल्या चौफुलीवर एक पानटपरी आहे. या टपरीसमोर उभ्या असलेल्या ३२ वर्षांच्या तरुणावर गोळीबार झाला. दोन गोळ्या लागल्यामुळे तरुण जखमी झाला.
https://prahaar.in/2026/08/15/voters-urged-to-fill-out-the-enumeration-form-before-august-17-for-the-sir-process/
सुमित पगारे असे जखमी तरुणाचे नाव आहे. या तरुणाला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. सुमितच्या पोटात दोन गोळ्या लागल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. पोलीस गोळीबार प्रकरणी तपास करत आहेत.
https://prahaar.in/2026/08/15/no-communication-blackout-even-on-the-day-of-the-amrut-snan/
सुमित पगारे काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आला आहे. अमली पदार्थांशी संबंधित प्रकरणात तो काही काळ तुरुंगात होता, त्यामुळे रविवारी झालेला गोळीबार एखाद्या जुन्या वादाशी सबंधित असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.