मुंबई : स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा होत असताना मुंबईच्या पश्चिम उपनगरातून मोठी बातमी आली आहे. वांद्रे पश्चिम येथील एका इमारतीला आग लागल्याची ही बातमी आहे. वांद्रे पश्चिम येथील स्टेशन रोडवरील एमके चेंबूर या सात मजली इमारतीच्या बी विंगला आग लागली. या दुर्घटनेत श्वास गुदमरल्यामुळे तब्येत ढासळलेल्या सात जणांना अग्निशमन दलाने वाचवले आणि भाभा रुग्णालयात दाखल केले.
https://prahaar.in/2026/08/12/vile-parle-fire-massive-fire-in-vile-parle-two-dead-including-a-two-and-a-half-year-old-child-and-six-injured/
आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला सकाळी १०.२३ वाजता मिळाली आणि त्यांनी तातडीने कारवाई करून १०.४९ पर्यंत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. श्वास गुदमरल्यामुळे तब्येत ढासळलेल्या गजाला जावेद शेख (४७), जावेद दिलदार शेख (४८), ताहिरा इस्माईल शेख (२८), मोहिमुद्दीन जावेद शेख (८), इस्माईल अखिनुद्दीन शेख (३८), मरिहा जावेद शेख (१२) आणि मेहनूर जावेद शेख (२०) या सात जणांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वेळेत उपचार मिळाल्यामुळे सर्वांची प्रकृती स्थिर आहे. सध्या सर्व जण भाभा रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात उपचार घेत आहेत.
https://prahaar.in/2026/08/15/zeeshan-siddique-receives-death-threat-from-a-portuguese-number-non-cognizable-nc-complaint-filed-with-bandra-police/
याआधी मंगळवारी मुंबईच्या पश्चिम उपनगरातच आग लागल्याची एक घटना घडली होती. विलेपार्ले पश्चिम येथील इमारतीच्या अकराव्या मजल्याला आग लागली होती. या दुर्घटनेत अडीच वर्षांचे बाळ आणि २३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. बॅप्टिस्टा रोडवरील ११ मजली इमारतीच्या ११ व्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ११०१ आणि ११०२ मध्ये रात्री १०:०८ च्या सुमारास आग लागली. ही आग सुमारे ४,००० चौरस फूट परिसरात पसरली होती आणि ती केवळ विद्युत वायरिंग व इन्स्टॉलेशन्स, एक एअर-कंडिशनिंग युनिट आणि घरातील वस्तूंपुरतीच मर्यादित होती. सुरुवातीला ही लेव्हल वन ची आग असल्याचे सांगण्यात आले पण नंतर आग लेव्हल टू ची होती, अशी माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाने बुधवारी पहाटे एकच्या सुमारास ही आग नियंत्रणात आणली होती. या दुर्घटनेत जखमी झालेल्या आठ पैकी दोन जणांना कूपर आणि सहा जणांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.