Home ब्रेकिंग न्यूज Navroz 2026 : दादर पारसी कॉलनीत उत्साहात नवरोज साजरा; पारसी बांधवांकडून नवीन वर्षाचे स्वागत

Navroz 2026 : दादर पारसी कॉलनीत उत्साहात नवरोज साजरा; पारसी बांधवांकडून नवीन वर्षाचे स्वागत

0
Navroz 2026 : दादर पारसी कॉलनीत उत्साहात नवरोज साजरा; पारसी बांधवांकडून नवीन वर्षाचे स्वागत
Navroz celebrated with enthusiasm in Dadar Parsi Colony

मुंबई: शनिवारी मुंबईत पारसी समाजाने अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात पारसी नववर्ष म्हणजेच ‘नवरोज’ (Navroz) साजरा केला. दादर पारसी कॉलनीतील रुस्तम फ्रामना अग्यारी येथे पारसी बांधवांनी एकत्र येत विशेष प्रार्थना केली आणि नवीन वर्षाचे स्वागत केले. या प्रसंगी पारसी समाजामध्ये एकच आनंद व चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले.

https://prahaar.in/2026/08/15/mumbra-to-soon-be-renamed-mumbradevi-special-campaign-to-make-the-states-coastline-jihad-free-minister-nitesh-rane-hints/

फारसी भाषेत ‘नवरोज’ या शब्दाचा अर्थ ‘नवीन दिवस’ असा होतो. हा सण नवी सुरुवात, समृद्धी आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. दादरच्या प्रसिद्ध पारसी कॉलनीत पारंपरिक विधी, सामुदायिक मेळावे आणि धार्मिक अनुष्ठान पार पडले. मुंबईसह देशभरात हा सण मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

नवरोजच्या या पवित्र प्रसंगी देशाच्या आणि राज्याच्या प्रमुख नेत्यांनी पारसी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून देशवासीयांना शुभेच्छा देताना म्हटले, “नवरोजच्या विशेष प्रसंगी हार्दिक शुभेच्छा. समृद्धी आणि आनंदाने भरलेल्या वर्षासाठी प्रार्थना. सर्वजण निरोगी राहोत आणि सर्व आकांक्षा पूर्ण होवोत. नवरोज मुबारक!”

https://prahaar.in/2026/08/15/nashik-flag-hoisting-at-the-divisional-commissioners-office-by-minister-girish-mahajan/

याशिवाय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनीही नागरिकांना नवरोजच्या गोड शुभेच्छा दिल्या. महापौर तावडे यांनी आपल्या संदेशात म्हटले की, हा सुंदर सण प्रत्येकाच्या जीवनात शांती, आनंद आणि नवीन आशा घेऊन येवो. पारसी समाजाचे बांधव नवीन कपडे परिधान करून, एकमेकांना भेटून ‘नवरोज मुबारक’ अशा शुभेच्छांची देवाणघेवाण करत असतात. अग्यारीमध्ये जाऊन अग्निपूजा करण्याची आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्याची ही जुनी परंपरा आहे. मुंबईतील या पारंपारिक आणि सांस्कृतिक उत्सवाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले असून, या सणाने शहराच्या सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडवले आहे.