Home ब्रेकिंग न्यूज Major blow in the Iran conflict : अमेरिकेने गमावला ड्रोन ताफ्याचा चतुर्थांश भाग, ४५ ‘एमक्यू-९ रीपर’ नष्ट

Major blow in the Iran conflict : अमेरिकेने गमावला ड्रोन ताफ्याचा चतुर्थांश भाग, ४५ ‘एमक्यू-९ रीपर’ नष्ट

0
Major blow in the Iran conflict : अमेरिकेने गमावला ड्रोन ताफ्याचा चतुर्थांश भाग, ४५ ‘एमक्यू-९ रीपर’ नष्ट
US loses a quarter of its drone fleet

इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे अमेरिकेच्या लष्कराला मोठे आर्थिक आणि सामरिक नुकसान सहन करावे लागत आहे. ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या वृत्तानुसार, या युद्धात अमेरिकेने आपले किमान ४५ महागडे एमक्यू-९ रीपर (MQ-9 Reaper) ड्रोन गमावले आहेत. ही संख्या अमेरिकेच्या एकूण ड्रोन ताफ्याच्या सुमारे एक चतुर्थांश (२५ टक्के) आहे. या विध्वंसामुळे अमेरिकेचे अंदाजे १.३ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे. 

https://prahaar.in/2026/08/14/ranveer-singhs-pralay-to-be-shot-in-mumbai-instead-of-australia-rumors-suggest-deepika-is-the-reason-for-the-change/

होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ विनाशाचा सामना

एमक्यू-९ रीपर हा अत्यंत आधुनिक आणि पाळत ठेवण्यासह अचूक हल्ले करणारा पाश्चात्त्य बनावटीचा ड्रोन आहे. सेन्सर्स आणि शस्त्रास्त्रांनुसार एका ड्रोनची किंमत ३० ते ५० दशलक्ष डॉलर्स दरम्यान असते. सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ या ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. मात्र, हे ड्रोन संथ गतीने आणि अनेकदा कमी उंचीवर उडत असल्यामुळे इराण आणि त्याच्या मित्र राष्ट्रांसाठी ते सोपे लक्ष्य ठरले आहेत. दरम्यान, सर्व ४५ ड्रोन पाडण्यात आलेले नसून, काही ड्रोन चालकांशी असलेला संपर्क तुटल्यामुळे कोसळल्याची माहिती समोर आली आहे.   

https://prahaar.in/2026/08/14/team-india-faces-a-spin-test-in-galle-jayasuriya-and-mendis-set-to-pose-a-major-challenge/

लष्कराच्या ताफ्यावर आणि शस्त्रास्त्र साठ्यावर ताण

युद्ध सुरू होण्यापूर्वी अमेरिकन हवाई दलाकडे सुमारे १६५ आणि मरीन कॉर्प्सकडे २० रीपर ड्रोन होते. मे महिन्यात हवाई दलाचे लेफ्टनंट जनरल डेव्हिड टेबर यांनी सिनेटला दिलेल्या माहितीनुसार, ही संख्या आता घसरून सुमारे १३५ वर आली आहे. या सततच्या संघर्षामुळे अमेरिकेच्या शस्त्रास्त्रांच्या साठ्यावर प्रचंड ताण आला आहे. युद्धाच्या पहिल्याच महिन्यात अमेरिकेने शेकडो टोमाहॉक क्षेपणास्त्रे आणि हजारहून अधिक पॅट्रियट व थाड (THAAD) इंटरसेप्टर्स खर्च केले आहेत. या प्रचंड खर्चामुळे पेंटागॉनसमोरील अडचणी वाढल्या असून, युद्धाचा खर्च भागवण्यासाठी आणि रिक्त साठा भरून काढण्यासाठी प्रशासनाकडून अब्जावधी डॉलर्सच्या अतिरिक्त पॅकेजची मागणी केली जात आहे.