मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपरमधील रमाबाई आणि कामराज नगरमधील झोपडपट्टीच्या पुनर्विकासासाठी हाती घेण्यात येणाऱ्या एसआरए योजनेसाठी तब्बल ४६ झाडे बाधित झाली आहेत. त्यातील ३५ झाडे कापली जाणार असून ११ झाडे पुनर्रोपित केली जाणार आहेत. या बाधित झाडांच्या बदल्यान संबंधित नियुक्त विकासक म्हणून एमएमआरडीए यांच्यामार्फत ९५५ झाडे लावून घेण्याची अट घालण्यात आली आहे.
https://prahaar.in/2026/08/14/western-railway-to-hold-a-jumbo-block-between-borivali-and-bhayandar-this-weekend-additional-trips-of-special-trains-announced-for-ganeshotsav/
घाटकोपर पूर्व मधील रमाबाई आणि कामराज नगर एसआरए प्रोजेक्टच्या कामात अडथळा निर्माण करणारी झाडे काढण्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या पुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. या एसआरए योजनेमध्ये ३५ झाडे कापण्यास आणि ११ झाडे पुनर्रोपित करणे अशा प्रकारे ४६ बाधित झाडे काढण्यास परवानगी मागितली आहे. तर उर्वरीत ४४ झाडे तिथेच ठेवली जाणार आहे. कापण्यात येणाऱ्या झाडांमध्ये पिंपळ, विलायती चिंच, बदाम,कोकोस न्यूसिफेरा, नारळ, पर्जन्यवृक्ष, बदाम,बकुळ, पेल्टोफोरम, शेवर आदी प्रकारच्या झाडांचा समावेश आहे.
https://prahaar.in/2026/08/14/chamoli-tunnel-tragedy-7-workers-dead-2-still-missing-rescue-operations-in-full-swing/
या बाधित झाडांच्या बदल्यात भरपाई म्हणून त्याच भूभागावर उपलब्ध असलेल्या २५८३ चौरस मीटरच्या मोकळ्या जागेवर तसेच मनोरंजन मैदानाकरता राखीव असलेल्या १२३४ चौरस मीटर इतक्या क्षेत्रावर ९५५ झाडे ही पारंपारिक पध्दतीने लावण्यात येणार आहे. याबाबतचे हमी संबंधित एमएमआरडीए यांच्याकडून घेण्यात आली आहे. एमएमआरडीए यांच्या मार्फत करण्यात येणार आहे.