Home ताज्या घडामोडी Baramati Plane Accident : बारामतीमध्ये सात महिन्यांत तिसरा विमान अपघात, प्रशिक्षण विमानानं धावपट्टी सोडली आणि झाला अपघात

Baramati Plane Accident : बारामतीमध्ये सात महिन्यांत तिसरा विमान अपघात, प्रशिक्षण विमानानं धावपट्टी सोडली आणि झाला अपघात

0
Baramati Plane Accident : बारामतीमध्ये सात महिन्यांत तिसरा विमान अपघात, प्रशिक्षण विमानानं धावपट्टी सोडली आणि झाला अपघात

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामतीत यंदाच्या वर्षातला तिसरा विमान अपघात झाला आहे. ताजी घटना आज म्हणजेच रविवार ९ ऑगस्ट २०२६ रोजी घडली. दुपारी १२:३५ च्या सुमारास विमानतळ परिसरात, धावपट्टीपासून थोड्या अंतरावर अपघात झाला. बारामती विमानतळावर प्रशिक्षण सुरू असताना विमान धावपट्टीवरून घसरले. हे विमान थेट धावपट्टीजवळच असलेल्या गवताळ भागात गेले. या अपघातात जीवितहानी झालेली नाही. कॅप्टन चिराग शशिकांत डोईफोडे आणि कॅडेट अभिजीत जुंद्रे हे दोघे सुरक्षित आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)


https://prahaar.in/2026/08/09/katraj-milk-prices-to-increase-by-two-rupees-per-liter-starting-tuesday-11-august-2026/

विमान सुरुवातीला लिंक ब्राव्होमधून धावपट्टीवर आले, रनवे २९ च्या थ्रेशोल्डवर सरळ रेषेत आले आणि उड्डाण आयत्यावेळी रद्द झाले. नंतर, विमान रनवे ११ च्या थ्रेशोल्डवर सरळ रेषेत आले, जिथे पुन्हा एकदा उड्डाण रद्द करण्यात आले. या प्रक्रियेदरम्यान, विमान धावपट्टीवर पूर्णपणे थांबवता आले नाही आणि ते रनवे २९ च्या थ्रेशोल्डच्या पुढे गेले. त्यानंतर, रनवे २९ च्या थ्रेशोल्डच्या पलीकडे, ते वाढवलेल्या पक्क्या पृष्ठभागावरून उजव्या बाजूला गवताळ भागात गेले आणि घसरले

https://prahaar.in/2026/08/08/all-mps-from-the-sharad-pawar-faction-will-meet-the-prime-minister-on-monday/

याआधी १३ मे २०२६ रोजी एका खासगी कंपनीचे प्रशिक्षण विमान विमानतळाच्या धावपट्टीजवळ असलेल्या गोजुबावी गावाच्या परिसरात कोसळले. या अपघातात जीवितहानी झाली नाही. मे महिन्यातील अपघाताआधी जानेवारी महिन्यात झालेल्या अपघातामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला मोठा धक्का बसला होता. याच वर्षी (२०२६) २८ जानेवारी रोजी लिअरजेट ४५ हे विमान कोसळून राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे निधन झाले होते. या अपघातात अजित पवारांचा एक सुरक्षा अधिकारी तसेच एक हवाई सुंदरी, मुख्य वैमानिक सुमित कपूर आणि फर्स्ट ऑफिसर शांभवी पाठक यांचाही मृत्यू झाला होता.

https://prahaar.in/2026/08/09/sindhudurg-is-the-countrys-first-district-to-use-ai-for-effective-administration-find-out-how-ai-was-utilized/

अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला, त्या घटनेला सात महिने होण्याआधीच बारामतीत आणखी दोन विमान अपघात झाले आहेत. मे महिन्यात एक आणि ऑगस्ट महिन्यात आणखी एक अपघात झाला.

https://prahaar.in/2026/08/09/police-raid-a-pub-where-the-party-was-in-full-swing-until-3-am-80-to-100-young-men-and-women-detained/

जानेवारीत झालेल्या घटनेप्रकरणी विमान अपघात तपास यंत्रणा (Aircraft Accident Investigation Bureau / AAIB) चौकशी करत आहे. एएआयबीचा अंतिम अहवाल जानेवारी २०२७ मध्ये येण्याची शक्यता आहे. आतापर्यंतच्या तपासावरून कमी दृश्यमानतेमुळे अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्राथमिक अहवालात, बारामती येथील धावपट्टीवरील अस्पष्ट होत असलेल्या खुणा आणि धावपट्टीच्या पृष्ठभागावर असलेल्या सुट्या खडीकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. अनियंत्रित विमानतळांवर सुरक्षिततेचे नियम पाळले जावेत यासाठी आवश्यक ते उपाय करण्याची शिफारस प्राथमिक अहवालातून एएआयबीने डीजीसीएला (Directorate General of Civil Aviation / DGCA) केली आहे.

https://prahaar.in/2026/08/09/one-year-old-girl-dies-after-slipping-from-mothers-grasp-and-falling-off-a-two-wheeler-tragedy-in-vasai/

दरम्यान, बारामती विमानतळाचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय झाला आहे. प्रभावी उड्डाण मार्गदर्शन आणि व्यवस्थापनासाठी एक स्वतंत्र हवाई वाहतूक नियंत्रण (एटीसी) टॉवर उभारण्याची योजना आहे. त्यात एक विस्तारित धावपट्टी देखील असेल. रात्रीच्या वेळी विमानांचे सुरक्षित टेक ऑफ आणि लँडिंग व्हावे यासाठी विशेष यंत्रणा बसवण्याचाही निर्णय झाला आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी एक स्वतंत्र अग्निशमन केंद्र आणि एक मजबूत सुरक्षा भिंत उभारण्याचीही योजना आहे. पण हे आधुनिकीकरण होण्याआधीच २८ जानेवारी ते ९ ऑगस्ट २०२६ दरम्यान बारामतीत तीन विमान अपघात झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here