Home क्रीडा Nashik : जपानमधील आशियाई मॅरेथॉन स्पर्धेत अक्षय लिलकेने रोवला भारताचा झेंडा, तीन किमी ‘कॅनोइंग’ रेसमध्ये पटकावले कांस्यपदक

Nashik : जपानमधील आशियाई मॅरेथॉन स्पर्धेत अक्षय लिलकेने रोवला भारताचा झेंडा, तीन किमी ‘कॅनोइंग’ रेसमध्ये पटकावले कांस्यपदक

0
Nashik : जपानमधील आशियाई मॅरेथॉन स्पर्धेत अक्षय लिलकेने रोवला भारताचा झेंडा, तीन किमी ‘कॅनोइंग’ रेसमध्ये पटकावले कांस्यपदक

Nashik : जपानमधील क्युटो शहरात सुरु असलेल्या सहाव्या आशियाई कॅनोइंग अँड कयाकिंग मॅरेथॉन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय संघाकडून प्रतिनिधित्व करताना नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक समाज (मविप्र) संस्थेतील अक्षय लिलके या खेळाडूने कॅनोइंग या क्रीडा प्रकारात कांस्यपदक पटकावत जपानमध्ये भारताचा तिरंगा फडकावला.

https://prahaar.in/2026/08/08/special-traffic-and-power-block-between-matunga-and-kurla-for-sion-rob-work-schedule-of-local-and-express-trains/

अक्षय शांताराम लिलके हा मविप्र समाजाच्या पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयाचा राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता नौकानयनपटू आहे. चार दिवसांपूर्वी आशियाई कॅनोइंग अँड कयाकिंग मॅरेथॉन स्पर्धेसाठी जपानला रवाना झालेल्या भारतीय संघामध्ये अक्षय लिलकेचा समावेश झालेला आहे. या संघासोबत प्रशिक्षक म्हणून नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयातील क्रीडा संचालक प्रा. हेमंत पाटील हेदेखील सहभागी झाले आहेत.

https://prahaar.in/2026/07/28/nashiks-sarvesh-kushares-inspiring-leap/

तीन किमी ‘कॅनोइंग’ रेसमध्ये पटकावले कांस्यपदक

क्युटो शहरातील कुमी हामा बे कॅनो स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या कॅनोइंग स्पर्धेत तीन किलोमीटर रेसमध्ये भारताच्या अक्षय शांताराम लिलके या खेळाडूने २२ मिनिटे ४५ सेकंद आणि ९३ मायक्रो सेकंद वेळ नोंदवत कांस्यपदक पटकावले. हाँगकाँग येथील तांग झी हॉंग या खेळाडूने २१ मिनिटे ९ सेकंद व ४४ मायक्रो सेकंद वेळ नोंदवत रौप्य पदक तर जपानच्या झुन्ता वाटनबे या खेळाडूने १८ मिनिटे ३० सेकंद आणि ८४ मायक्रो सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here