Home ब्रेकिंग न्यूज School Shooting News : १३ वर्षीय विद्यार्थ्याने शाळेत केला अंधाधुंद गोळीबार; आधी आजी-आजोबांची हत्या; मग शाळेत घुसून…

School Shooting News : १३ वर्षीय विद्यार्थ्याने शाळेत केला अंधाधुंद गोळीबार; आधी आजी-आजोबांची हत्या; मग शाळेत घुसून…

0
School Shooting News : १३ वर्षीय विद्यार्थ्याने शाळेत केला अंधाधुंद गोळीबार; आधी आजी-आजोबांची हत्या; मग शाळेत घुसून…

बँकॉक : थायलंडची राजधानी बँकॉकमधून एका अत्यंत भयानक आणि काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेची बातमी समोर आली आहे. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या अवघ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने घडवून आणलेल्या रक्ताळलेल्या थराराने संपूर्ण जग सुन्न झाले आहे. या विद्यार्थ्याने आधी स्वतःच्या घरी आजी-आजोबांची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर शाळेत पोहोचून अंदाधुंद गोळीबार केला. या अमानुष हल्ल्यात शिक्षकांसह अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, हल्ल्यानंतर आरोपी विद्यार्थ्याने स्वतःवरही गोळी झाडून जीवनयात्रा संपवली आहे.

घरी आजी-आजोबांवर झाडल्या गोळ्या

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, शाळेत जाण्यापूर्वी या विद्यार्थ्याने राहत्या घरीच आपल्या आजी आणि आजोबांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. त्यानंतर घरातीलच एका सदस्याची बंदूक सोबत घेऊन तो थेट आपल्या शाळेच्या दिशेने निघाला. शाळेत पोहोचताच त्याने कोणतीही दया न दाखवता तेथील शिक्षक आणि वर्गात बसलेल्या आपल्याच वर्गमित्रांवर थेट फायरिंग करण्यास सुरुवात केली. ही बंदूक त्याने घरातील नक्की कोणाकडून आणि कशी घेतली, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

https://prahaar.in/2026/08/07/saba-pataudi-saif-ali-khan-sister-remains-unmarried-at-50-reveals-reason-did-not-attend-saif-amrita-singh-wedding/

शाळेत अचानक उडाला प्रचंड गोंधळ

सकाळच्या वेळी अचानक सुरू झालेल्या गोळीबाराच्या आवाजाने संपूर्ण शाळा परिसरात एकच पळापळ आणि गोंधळ उडाला. विद्यार्थी जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. सुरवातीला हा आवाज फटाक्यांचा असावा असा गैरसमज काहींना झाला, मात्र एकापाठोपाठ एक गोळ्यांचे आवाज येऊ लागल्याने शाळेत दहशतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर शाळेबाहेर पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आक्रोश केला.

मृतांमध्ये ३ शिक्षक अन् ४ विद्यार्थ्यांचा समावेश

घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन यंत्रणा आणि पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तपास पथक शाळेत पोहोचले तेव्हाही एका मजल्यावर गोळीबाराचा आवाज येत होता. तिथे एका मजल्यावर एक शिक्षक मृत अवस्थेत आढळून आले, तर दुसऱ्या वर्गात एक महिला शिक्षक छातीवर आणि हातावर गोळ्या लागलेल्या गंभीर स्थितीत सापडल्या. या संपूर्ण भीषण घटनेत ३ शिक्षक आणि ४ विद्यार्थी असे ७ जण शाळेत मारले गेले, तर आजी-आजोबा आणि स्वतः आरोपी मिळून एकूण ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

१५ जण गंभीर जखमी; पोलिसांकडून तपासाचा वेग

थायलंडचे शिक्षण मंत्री प्रासेर्ट जंतारारुआंगटोंग यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या हल्ल्यात सुमारे १५ लोक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. जखमींपैकी बहुतेकांच्या पाठीवर, छातीवर आणि हातावर गोळ्या लागल्या आहेत. अवघ्या आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने एवढे मोठे आणि भीषण कृत्य नक्की कोणत्या कारणातून केले, या हत्येमागचा मुख्य उद्देश काय होता, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here