Home ब्रेकिंग न्यूज Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर

0
Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर

मुंबई : केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह आजपासून (शुक्रवार ७ ऑगस्ट २०२६) दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत असून, शनिवारी त्यांच्या उपस्थितीत दोन महत्त्वाचे कार्यक्रम पार पडणार आहेत. केंद्रीय मंत्री शाह यांचे आज रात्री उशिरा मुंबईत आगमन होणार आहे.

https://prahaar.in/2026/08/07/oppositions-political-stunt-under-the-guise-of-student-protests-deputy-chief-minister-eknath-shinde-launches-a-scathing-attack-on-the-congress/

शनिवारी सकाळी ११ वाजता अमित शाह यांच्या हस्ते नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या नवनिर्मित मुख्यालयाचे अधिकृत उद्घाटन करण्यात येणार आहे. सहकार क्षेत्राला बळकटी देण्याच्या दृष्टीने स्थापन करण्यात आलेल्या या संस्थेच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याला सहकार आणि बँकिंग क्षेत्रातील अनेक ज्येष्ठ पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यानंतर, केंद्रीय मंत्री अमित शाह हे मुंबई शेअर बाजारातील (बीएसई) इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. या दोन्ही कार्यक्रमांच्या माध्यमातून ते सहकार आणि आर्थिक क्षेत्रातील दिग्गजांशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यादरम्यान राज्यातील काही प्रमुख नेत्यांशी त्यांची अनौपचारिक भेट होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. तसेच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी काही मुद्यांवर अमित शाह सविस्तर चर्चा करण्याचीही शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here