Home महाराष्ट्र नाशिक Nashik TCS Case : मतीन पटेलला ‘या’ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी

Nashik TCS Case : मतीन पटेलला ‘या’ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी

0
Nashik TCS Case : मतीन पटेलला ‘या’ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी

Nashik TCS Case : नाशिकमधील बहुचर्चित टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कंपनीत घडलेल्या लैंगिक शोषण आणि बळजबरीने धर्मांतर घडवून आणण्याच्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी निदा खान हिला स्वतःच्या घरात आश्रय दिल्याप्रकरणी एमआयएमचा (AIMIM) नगरसेवक मतीन पटेल याला नाशिक पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथून काल रात्री अटक केली होती. दरम्यान, आज दुपारी मतीन पटेलला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने ११ ऑगस्टपर्यंत पटेलला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

https://prahaar.in/2026/08/07/jalgaon-crime-the-husband-poured-alcohol-on-his-wife/

मतीन पटेलची आतापर्यंत तीन वेळा चौकशी

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (SIT) मतीन पटेल यांची आतापर्यंत तीन वेळा चौकशी केली होती. चौकशीदरम्यान त्यांच्याकडून अनेक महत्त्वाची माहिती घेण्यात आली असून, तपासासाठी त्यांचा मोबाईल फोनही जप्त करण्यात आला. मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड, संदेश आणि इतर डिजिटल माहितीची तपासणी सुरू असल्याची माहिती तपास यंत्रणांकडून मिळाली आहे.

https://prahaar.in/2026/08/07/so-far-only-0-30-percent-of-kunbi-caste-validity-certificates-have-been-cancelled/

११ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

दरम्यान, नाशिक रोड न्यायालयात ( Nashik Road Court ) सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश असूनही मतीन पटेल न्यायालयात उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या विरोधात नॉन-बेलेबल वॉरंट (NBW) जारी केले. त्यानंतर नाशिक पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून, आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.दरम्यान, आज दुपारी मतीन पटेलला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने ११ ऑगस्टपर्यंत पटेलला न्यायालयीन कोठडी ( Judicial custody ) सुनावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here