Ahilyanagar Crime : अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर (Parner) तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्यातील कडूस गावामध्ये उषा पांडुरंग शिंदे (वय 42) या मानसिक रुग्ण असणार्या महिलेचा खून झाला आहे. ही घटना गुरुवारी घडली असून याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात (Supa Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Ahilyanagar Crime)
मिळालेल्या माहितीनुसार, पारनेर तालुक्यातील उषा शिंदे या मनोरुग्ण महिलेचा मृतदेह कडूस गावाच्या परिसरात आढळून आला. मयत शिंदे या महिलेच्या डोक्यात दगडाने वार करून तिचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांना असून याप्रकरणी नामदेव करंजुले यांच्या खबरवरून पोलिसात अज्ञात व्यक्ती विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर महिलेच्या मृतदेहाचे पीएम केल्यानंतर मृत्यूचे कारण समोर येणार आहे. पुढील तपास सुपा पोलिसांकडून सुरु आहेत. (Ahilyanagar Crime)
https://prahaar.in/2026/08/07/major-action-in-the-tcs-case/
भीषण अपघातात 35 वर्षीय महिलेचा मृत्यू
दरम्यान, दुसरीकडे पाथर्डी ( Pathardi ) तालुक्यातील खरवंडी येथील कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे तर तिचे पती जखमी झालेत. अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढणार्या कारमधील चौघा युवकांना बडेवाडी टोलनाक्याजवळ नागरिकांनी पाठलाग करून पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले. (Ahilyanagar Crime)
या अपघातात रत्ना सुनील राठोड (वय 35, रा. सेवानगर तांडा, तोंडोळी ता. पाथर्डी) यांचा मृत्यू झाला असून त्यांचे पती सुनील उत्तम राठोड हे जखमी झाले आहेत. अपघात घडल्यानंतर कारमधील चार युवक घटनास्थळावरून पळून गेले. मात्र, सतर्क नागरिकांनी त्यांचा पाठलाग करून बडेवाडी टोलनाक्याजवळ त्यांना अडविले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात ( Pathardi Police Station ) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.