Nashik : नाशिक जिल्ह्याला जणू लाचखोरीचे ग्रहण लागले आहे. जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमधील लाचखोरीचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीये. अशातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आणखी एक मोठी कारवाई केली आहे. नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation) सिडको विभागीय कार्यालयातील (CIDCO Divisional Office) सहायक अधीक्षकाला इमारतीच्या वाहनतळातील तीन गाळ्यांच्या बांधकामाची घरपट्टी आकारणी नियमित बांधकामांतर्गत करण्यासाठी ६० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Corruption Bureau) पथकाने रंगेहात पकडले. मारुती भीमाजी डोंगरे (वय ५६, रा. लक्ष्मीनगर, पाण्याची टाकी, राणा प्रताप चौक, महाले फार्म, सिडको) असे संशयिताचे नाव आहे.
https://prahaar.in/2026/08/06/complete-the-tasks-prior-to-the-simhastha-flag-hoisting-ceremony-on-time/
नेमके प्रकरण काय ?
मारुती डोंगरे (Maruti Dongre) हे नाशिक महानगरपालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयातील (CIDCO Divisional Office) घरपट्टी विभागात सहायक अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदाराच्या इमारतीच्या वाहनतळ परिसरात तीन गाळे आहेत. या गाळ्यांच्या घरपट्टी आकारणीसंदर्भात ते डोंगरे यांना भेटले होते. डोंगरे आणि त्यांचे सहायक पानसरे यांनी २ जुलै रोजी संबंधित इमारतीची पाहणी करून वाहनतळ परिसरातील गाळ्यांचे मोजमाप केले. मात्र इथे त्यांना पैसे लाटण्याची संधी शोधली. तक्रारदाराच्या गाळ्यांचे अनधिकृत बांधकाम नियमित करून घरपट्टी आकारणी करण्याच्या मोबदल्यात ७० हजार रुपये, तसेच यापूर्वी इमारतीची घरपट्टी आकारून दिल्याबद्दल बाकी असलेले १० हजार रुपये, असे एकूण ८० हजार रुपयांची लाच डोंगरे यांनी मागितल्याचा आरोप आहे.
https://prahaar.in/2026/08/06/avoid-misusing-the-alarm-chain-on-trains/
६० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक
मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti-Corruption Bureau) याबाबत तक्रार दाखल केली. दरम्यान, तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी केली असता, डोंगरे यांनी ८० हजार रुपयांची लाच मागितल्याचे व ती स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीने सापळा रचत सिडको विभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तक्रारदाराकडून ६० हजार रुपयांची लाच स्वीकारताना डोंगरे यांना रंगेहात पकडले. मारुती डोंगरेविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र मात्र शासकीय कार्यालयांमध्येच अशाप्रकारे लाचखोरीचा प्रकार समोर आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.