Home नाशिक कुंभमेळा Simhastha Kumbh Mela 2027 : सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यापूर्वीची कामे वेळेत पूर्ण करा; कुंभमेळा प्राधिकरणाचे विभागांना निर्देश

Simhastha Kumbh Mela 2027 : सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यापूर्वीची कामे वेळेत पूर्ण करा; कुंभमेळा प्राधिकरणाचे विभागांना निर्देश

0
Simhastha Kumbh Mela 2027 : सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यापूर्वीची कामे वेळेत पूर्ण करा; कुंभमेळा प्राधिकरणाचे विभागांना निर्देश

Simhastha Kumbh Mela 2027 : कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या औपचारिक प्रारंभाचे प्रतीक असलेल्या ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधा कामांचा आढावा घेण्यात आला. नाशिक येथील रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त येथे हा ध्वजारोहण सोहळा होणार असून, त्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.

https://prahaar.in/2026/08/06/chandrashekhar-bawankule-i-am-ready-to-undergo-a-narco-test/

सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यापूर्वीची कामे वेळेत पूर्ण करा

बैठकीत रामकाल पथ व रामकुंड परिसरातील रस्त्यांची कामे, त्र्यंबकेश्वरमधील पाणीपुरवठा योजना, कुशावर्त कुंडाचे संवर्धन, दर्शन पथाची उभारणी, ध्वजस्तंभाशी संबंधित कामे तसेच गजानन महाराज संस्थान ते आंबेडकर चौक या मार्गाच्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी आयुक्त शेखर सिंह यांनी सर्व यंत्रणांना ध्वजारोहण सोहळ्यापूर्वी सर्व कामे दर्जेदार पद्धतीने आणि निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. ध्वजारोहणाच्या वेळी कोणतेही काम अपूर्ण राहता कामा नये, अशी स्पष्ट सूचना त्यांनी केली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा हा महत्त्वाचा टप्पा असून, या सोहळ्यास साधू-संत, महंत आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने सर्व सुविधा वेळेत उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

https://prahaar.in/2026/08/06/a-startling-discovery-of-a-hidden-world-deep-within-the-earth-the-mysterious-devil-worm-and-the-vast-subterranean-ecosystem/

सिंहस्थ कामांच्या प्रगतीचा आढावा

बैठकीत संबंधित विभागांकडून कामांच्या प्रगतीचा आढावा, टप्पानिहाय पूर्णत्वाचे वेळापत्रक तसेच विविध विभागांतील समन्वयाची आवश्यकता असलेल्या बाबींवरही चर्चा करण्यात आली. या बैठकीस नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, कुंभमेळा प्राधिकरण अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे यांच्यासह महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमएसआयडीसी), जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य पुरातत्त्व विभाग, त्र्यंबकेश्वर नगरपरिषद तसेच नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील पुरोहित संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here