परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; मराठीचा मान राखणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र कवेत घेईल
मुंबई : “महाराष्ट्रात उपजीविका करायची असेल, तर मराठी भाषेशी नाळ जोडलीच पाहिजे. ही सक्तीची नव्हे, तर आपुलकीची भाषा आहे. प्रवाशांशी दोन प्रेमाचे शब्द मराठीत बोलणारा प्रत्येक चालक हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा दूत ठरतो,” अशा शब्दांत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाला’ मिळालेल्या यशाचा गौरव केला. या अभियानाअंतर्गत राज्यभरातील १ लाखांहून अधिक अमराठी व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांनी व्यावहारिक मराठीचे धडे यशस्वीरीत्या पूर्ण केले असून, उर्वरित चालकांनीही १५ ऑगस्टपूर्वी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरनाईक यांनी केले.
https://prahaar.in/2026/08/06/chandrashekhar-bawankule-i-am-ready-to-undergo-a-narco-test/
परिवहन विभागाने घेतलेल्या या विशेष आढावा बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप ढवण, मुंबई मराठी साहित्य संघ तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेचे प्रतिनिधी उपस्थित होते. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर सुरू करण्यात आलेल्या या अभियानाला अमराठी बांधवांकडून उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे यावेळी सांगण्यात आले. राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राज्यभरात एका लोकचळवळीच्या रूपात राबवले जात आहे.
https://prahaar.in/2026/08/06/tata-motors-launches-the-spectacular-nexon-camo-edition-prices-start-at-%e2%82%b99-99-lakh/
१ मेपासून सुरू झालेल्या या राज्यव्यापी अभियानाचा औपचारिक समारोप १७ ऑगस्ट रोजी ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या हजारो अमराठी चालकांना अधिकृत प्रमाणपत्रांचे वाटप केले जाईल. परिवहन विभागाने १५ ऑगस्टपर्यंत उर्वरित सर्व अमराठी चालकांना हे प्रशिक्षण पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.