Home ताज्या घडामोडी `Monsoon Health Tips : पावसाळ्यातील सर्व आजारांवर रामबाण उपाय; स्वयंपाक घरातील पदार्थ वापरुन सहज तयार करा

`Monsoon Health Tips : पावसाळ्यातील सर्व आजारांवर रामबाण उपाय; स्वयंपाक घरातील पदार्थ वापरुन सहज तयार करा

0
`Monsoon Health Tips : पावसाळ्यातील सर्व आजारांवर रामबाण उपाय; स्वयंपाक घरातील पदार्थ वापरुन सहज तयार करा
kadha

स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या मसाल्यांपासून तयार होणारा औषधी काढा कसा बनवायचा चला पाहूया

पावसाळा सुरू होताच वातावरणात गारवा वाढतो. थंड हवामानात सर्दी, खोकला, घसा दुखणे आणि पचनाच्या तक्रारीही जाणवतात.अशा वेळी शरीराला उष्णता मिळवून देण्यासाठी हा काढा फायदेशीर ठरू शकतो. आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या काही मसाल्यांपासून हा काढा काही मिनिटांत तयार होतो. विशेष म्हणजे पावसाळ्यातील बदलत्या हवामानात शरीर ताजेतवाने (Fresh) ठेवण्यासही हा काढा मदत करू शकतो.

https://prahaar.in/2026/08/06/sit-formed-to-probe-irregularities-in-ayushman-bharat-and-jan-arogya-yojana/

काढा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य :
२ कप पाणी
१ इंच ठेचलेल आलं
५-६ तुळशीची पाने
४-५ काली मिरी
एक छोटा दालचिनीचा तुकडा
एक लवंग आणि चिमूटभर हळद

हे मिश्रण ८-१० मिनिटे मंद आचेवर (Medium flame)  चांगले उकळा आणि नंतर गाळून घ्या, त्यात चवीनुसार थोडा गूळ किंवा मध मिसळा. काढा तयार आहे, हा काढा गरम असताना प्यायल्याने खूप चांगला फरक दिसतो.

आलं, तुळस आणि काळी मिरी यांसारखे पदार्थ पारंपरिक घरगुती उपायांमध्ये अनेक वर्षांपासून वापरले जात आहेत. हे घटक पचन सुधारण्यास, घशाला आराम देण्यास आणि शरीराला ऊब मिळण्यास मदत करू शकतात. दालचिनी आणि हळदीमुळे काढ्याचा सुगंध आणि चव वाढते. त्यामुळे पावसाळ्यात चहा किंवा थंड पेयांऐवजी हा काढा पिणे अधिक फायदेशीर ठरते.

https://prahaar.in/2026/08/06/usha-nadkarni-open-ups-about-loneliness-family-struggle-in-interview-know-her-past/

काढा हा संतुलित आहाराचा एक भाग म्हणून घेतला जाऊ शकतो. मात्र त्याचे अतिसेवन टाळावे. दिवसातून एकदा किंवा गरजेनुसार मर्यादित प्रमाणात हा काढा घेतल्यास त्याचा अधिक चांगला फायदा होऊ शकतो. ज्यांना दीर्घकालीन आजार आहेत किंवा नियमित औषधे सुरू आहेत त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच अशा घरगुती उपायांचा अवलंब करावा.

पावसाळ्यातील बदलत्या वातावरणात स्वतःची काळजी घेण्यासाठी महागडी उत्पादने वापरण्याची गरज नसते. स्वयंपाकघरातील साध्या मसाल्यांपासून तयार होणारा हा पावसाळी काढा शरीराला ऊब देण्यास, पोट हलके ठेवण्यास आणि दैनंदिन ताजेपणा टिकवून ठेवण्यास मदत करू शकतो. योग्य आहार, स्वच्छता आणि पुरेशी झोप यांसोबत हा घरगुती काढा पावसाळ्यात आरोग्याची उत्तम साथ देऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here