मुंबई : मुंबईतील विक्रोळी पार्कसाईट परिसरात कौटुंबिक वादातून घडलेल्या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. राहुल नगर येथे एकाच कुटुंबातील भावांमध्ये झालेल्या वादानंतर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या घटनेत एका व्यक्तीसह त्याच्या 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून पत्नी आणि लहान मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. (Mumbai News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल नगरमध्ये राहणाऱ्या विश्वकर्मा कुटुंबातील चार भाऊ एकाच घरात राहत होते. त्यापैकी काही जण घराच्या पोटमाळ्यावर वास्तव्यास होते. पहाटेच्या सुमारास सुनील विश्वकर्मा (40) यांनी मोठ्या आवाजात गाणी लावल्याने त्यांच्या भावांमध्ये वाद झाला. (Vikroli)
https://prahaar.in/2026/08/06/ahilyanagar-two-farmers-die-tragically-after-drowning-in-a-farm-pond/
या आवाजाबाबत सुरेंद्र विश्वकर्मा आणि सूरज विश्वकर्मा यांनी सुनील यांना जाब विचारला. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. काही वेळातच हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. आरोपानुसार, सुरेंद्र आणि सूरज यांनी धारदार शस्त्राने सुनील विश्वकर्मा आणि त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला केला. (Family Dispute)
या हल्ल्यात सुनील विश्वकर्मा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांचा 14 वर्षीय मुलगा श्लोक विश्वकर्मा याचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. सुनील यांची पत्नी अंजू विश्वकर्मा आणि लहान मुलगा विवान विश्वकर्मा हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Mumbai Police)
घटनेची माहिती मिळताच पार्कसाईट पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सुरेंद्र विश्वकर्मा आणि सूरज विश्वकर्मा या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. घटनास्थळावरील पुरावे जप्त करण्यात आले असून फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने पुढील तपास सुरू आहे. (Crime News)
या घटनेमागील नेमके कारण आणि वादाचे स्वरूप याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. या दुहेरी हत्याकांडामुळे विक्रोळी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Crime)