‘बिग बॉस ओटीटी २’ (Bigg Boss OTT 2) आणि रितेश देशमुखच्या (Riteish Deshmukh) ‘वेड’ या सुपरहिट चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी ग्लॅमरस अभिनेत्री जिया शंकर (Jiya Shankar) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तिचे नाव प्रसिद्ध युट्युबर अभिषेक मल्हानसोबत (Abhishek Malhan) जोडले जात होते आणि त्यांच्या साखरपुड्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, या सर्व चर्चा केवळ अफवा असल्याचे सिद्ध करत जियाने तिच्या आयुष्यातील खऱ्या जोडीदाराचा चेहरा जगासमोर आणला आहे.
“नाते कधीच नव्हते, मैत्रीही संपली”; अभिषेक मल्हानसोबतच्या अफवांवर स्पष्टीकरण
अभिषेक मल्हानसोबतच्या नात्यावर मौन सोडत जियाने सर्व स्पष्ट केले. ती म्हणाली, “आम्ही दोघे कधीही एकमेकांच्या प्रेमात नव्हतो, केवळ चांगले मित्र होतो. परंतु, आता ती मैत्रीही उरलेली नाही.” या खुलाशानंतर तिने इन्स्टाग्रामवर तिच्या होणाऱ्या पतीसोबतचे अत्यंत गोड अन् रोमँटिक फोटो पोस्ट करत चाहत्यांना साखरपुड्याची आनंदाची बातमी दिली.
“तूच माझे घर!”; होणाऱ्या पतीसाठी लिहिली भावूक अन् रोमँटिक पोस्ट
View this post on Instagram
आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरून साखरपुड्याचे फोटो शेअर करताना जियाने आपल्या होणाऱ्या पतीसाठी एक भावूक कॅप्शन लिहिले आहे. ती लिहीते, “जेव्हा तुम्ही अजिबात अपेक्षा करत नाही, तेव्हाच तुम्हाला खरे प्रेम मिळते, हे अगदी खरे आहे. देव बहुदा माझ्या संयमाची परीक्षा घेत होता. आपण हजारो मैल दूर असलो तरी तुझ्याशी बोलताना मला कायम घरी असल्याचा भास व्हायचा. विमानतळावर निरोप घेताना तू मला घट्ट जवळ घ्यायचास. जगात आपण कुठेही असू, पण माझे खरे घर कोणतीही वस्तू किंवा जागा नसून फक्त तूच आहेस!”
https://prahaar.in/2026/08/05/central-governments-operation-trishul-major-move-by-the-modi-government-274-fugitive-criminals-brought-back-to-india-from-36-countries-in-7-years-operation-trishul-has-bolstered-the-stren/
‘करण’ ठरला जियाचा रिअल लाईफ हिरो; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
आपल्या जोडीदाराचा उल्लेख ‘Kaaran’ (करण) असा करत जिया पुढे म्हणाली, “तुझ्यासोबतचे माझे आयुष्य म्हणजे एखादी रोमँटिक कॉमेडी फिल्म आहे आणि तुझ्यासोबत संपूर्ण आयुष्य जगण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.” जियाच्या या मिस्ट्री मॅनचे इन्स्टाग्राम अकाऊंट प्रायव्हेट असल्याने त्याच्याबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. मात्र, जियाने आपल्या प्रेमाची कबुली देत साखरपुड्याची घोषणा केल्याने सोशल मीडियावर तिच्यावर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.