Home महाराष्ट्र नाशिक Nashik News : नाशिकमध्ये राष्ट्रवादीकडून काँग्रेस विरोधात आंदोलन , ‘गुंगी गुडिया’वरून राजकारण तापलं

Nashik News : नाशिकमध्ये राष्ट्रवादीकडून काँग्रेस विरोधात आंदोलन , ‘गुंगी गुडिया’वरून राजकारण तापलं

0
Nashik News : नाशिकमध्ये राष्ट्रवादीकडून काँग्रेस विरोधात आंदोलन , ‘गुंगी गुडिया’वरून राजकारण तापलं

Nashik News : महाराष्ट्र काँग्रेसच्या (Maharashtra Congress) अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये त्यांचा ‘गुंगी गुडिया’ असा उल्लेख करण्यात आला होता. या व्हिडीओ वरून सध्या राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यात राज्यात ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काँग्रेसविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. याचेच पडसाद नाशिकमध्येही उमटले.

https://prahaar.in/2026/08/05/mngl-gas-pipeline-bursts-sparks-fire/

काँग्रेसविरोधात आंदोलन

आज (बुधवारी) अजित पवारांच्या राष्ट्रवादीने नाशिकमध्ये काँग्रेसविरोधात आंदोलन केले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Congress State President Harshvardhan Sapkal) यांच्या प्रतिमेला जोडो मारत राष्ट्रवादीने निषेध व्यक्त केला. दरम्यान, या राजकीय घडामोडींमुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाल्याचे पहायला मिळाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील टीकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काँग्रेसविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

https://prahaar.in/2026/08/05/nashik-crime-call-the-police-on-dial-112/

पोलिसांचा मोठा बंदोबस्त

आंदोलकांनी घोषणाबाजी करत आपला मोर्चा महात्मा गांधी रोडवरील काँग्रेस पक्ष कार्यालयाकडे वळवला. आंदोलनादरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. या आंदोलनात आमदार सरोज अहिरे, जिल्हाध्यक्ष विष्णूपंत म्हैसधुणे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, युवक अध्यक्ष अंबादास खैरे, भगूर नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे, दिलीप खैरे यांच्यासह विविध पदाधिकारी सहभागी झाले होते. मोर्चा एम. जी. रोडवरून पुढे सरकत असताना पोलिसांनी बॅरिकेड्स उभारून आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला. तसेच आंदोलनानंतर आंदोलकांनी काँग्रेस पक्ष कार्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

https://prahaar.in/2026/08/05/nashiks-udhamal-set-to-become-the-first-international-dark-sky-community-village/

सुनेत्रा पवार यांची माफी मागावी

काँग्रेसने ज्या पद्धतीने सुनेत्रा पवार यांच्याविषयी अपशब्द वापरले आहेत ते निषेधार्थ आहे. राज्यातील सर्व महिला सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी असून, आम्ही काँग्रेसच्या वक्तव्याचा निषेध करतो. हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठे मन करत सुनेत्रा पवार यांची माफी मागावी, अशी मागणी आमदार सरोज आहिरे (MLA Saroj Ahire) यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here