Home टेक्नॉलॉजी WhatsApp Cloud Backup : WhatsApp आणणार स्वतःचे क्लाऊड बॅकअप; 2GB मोफत, अधिक स्टोरेजसाठी मोजावे लागतील पैसे

WhatsApp Cloud Backup : WhatsApp आणणार स्वतःचे क्लाऊड बॅकअप; 2GB मोफत, अधिक स्टोरेजसाठी मोजावे लागतील पैसे

0
WhatsApp Cloud Backup : WhatsApp आणणार स्वतःचे क्लाऊड बॅकअप; 2GB मोफत, अधिक स्टोरेजसाठी मोजावे लागतील पैसे
WhatsApp Feature

व्हॉट्सॲप लवकरच स्वतःची क्लाऊड स्टोरेज सेवा सुरू करण्याच्या तयारीत असून, यामुळे चॅट बॅकअपसाठी Google Drive आणि Apple iCloud व्यतिरिक्त आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. नव्या सुविधेमध्ये वापरकर्त्यांचा चॅट बॅकअप थेट व्हॉट्सॲपच्या सर्व्हरवर सुरक्षित ठेवला जाईल. मात्र, ठरावीक मर्यादेपेक्षा अधिक स्टोरेज वापरणाऱ्या युजर्सना त्यासाठी मासिक शुल्क भरावे लागू शकते. (WhatsApp Cloud Backup)

रिपोर्टनुसार, ही सुविधा Android आणि iPhone या दोन्ही प्लॅटफॉर्मवरील वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहे. सुरुवातीला प्रत्येक वापरकर्त्याला 2GB क्लाऊड स्टोरेज मोफत दिले जाईल. या जागेत चॅट बॅकअप सेव्ह करता येईल. अधिक स्टोरेजची गरज असल्यास पेड प्लॅनची सुविधा दिली जाईल.

https://prahaar.in/2026/08/04/will-upi-become-a-paid-service-now-understand-the-provisions-of-the-bill-tabled-in-the-lok-sabha/

माहितीनुसार, 50GB स्टोरेजसाठी दरमहा सुमारे 1 डॉलर (सुमारे 95 रुपये) शुल्क आकारले जाऊ शकते. याशिवाय 1TB पर्यंतचे मोठे स्टोरेज प्लॅन्सही उपलब्ध होण्याची शक्यता असून, त्यासाठी अधिक शुल्क द्यावे लागेल. (WhastApp New Feature)

सध्या iPhone वापरकर्त्यांना 5GB मोफत iCloud स्टोरेज मिळते. या स्टोरेजमध्ये फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स, डिव्हाइस बॅकअप आणि WhatsApp चॅट बॅकअपचा समावेश असल्याने जागा लवकर भरते. त्यानंतर अतिरिक्त स्टोरेजसाठी Apple चे सशुल्क प्लॅन्स घ्यावे लागतात. WhatsApp चे स्वतंत्र क्लाऊड स्टोरेज उपलब्ध झाल्यास या समस्येवर काही प्रमाणात उपाय मिळू शकतो. (WhatsApp Backup)

सुरक्षेच्या दृष्टीने, WhatsApp च्या क्लाऊडमध्ये साठवलेले चॅट बॅकअपही एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असतील. त्यामुळे तृतीय पक्षाला या डेटामध्ये प्रवेश मिळणार नाही. तसेच हा बॅकअप पासकी, पासवर्ड आणि एन्क्रिप्शन कीद्वारे अधिक सुरक्षित ठेवता येईल.

सध्या ही सुविधा विकासाच्या टप्प्यात असून तिची सार्वजनिक चाचणी अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे WhatsApp चे हे नवीन क्लाऊड स्टोरेज फीचर सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होण्यास आणखी काही आठवडे लागू शकतात. (Technology)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here