ग्लासगो : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ च्या अखेरीस ग्लासगोमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचा बॉक्सर कुदरतुल्ला हा संघाच्या हॉटेलमधून गुपचूप निसटल्यामुळे पाकिस्तान बॉक्सिंग फेडरेशन (PBF) पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य ठरले आहे. आपल्या वजन गटातील स्पर्धा आटोपल्यानंतर तो अचानक गायब झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, कुदरतुल्लाचा पासपोर्ट टीम मॅनेजरकडेच जमा असतानाही तो पसार झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
https://prahaar.in/2026/08/04/land-from-the-khopoli-fish-seed-centre-will-be-allocated-for-the-water-storage-project-fish-production-will-not-be-affected-minister-nitesh-rane/
चुकीच्या कारणांमुळे पाकिस्तान बॉक्सिंग फेडरेशन चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अशा घटना घडल्या आहेत. २०२२ च्या राष्ट्रकुल खेळांदरम्यान सुलेमान बलोच आणि नझीरुल्ला खान हे दोन बॉक्सर बर्मिंगहॅममध्ये बेपत्ता झाले होते. तसेच २०२४ मध्ये इटलीतील जागतिक ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेदरम्यान आशियाई सुवर्णपदक विजेता बॉक्सर झोहेब रशीद आपल्या रूममेटचे विदेशी चलन आणि मौल्यवान वस्तू चोरून बुस्टो आर्सीझियो शहरातून पसार झाला होता.
https://prahaar.in/2026/08/04/billowing-smoke-and-public-outcry-massive-fire-at-a-building-in-ulhasnagar-over-10-vehicles-reduced-to-ashes/
दरम्यान, ग्लासगो येथे झालेल्या या क्रीडा स्पर्धेत महिला बॉक्सर फातिमा झेहरा हिने जिंकलेल्या एकाच कांस्य पदकावर समाधान मानत, ३६ सदस्यीय पाकिस्तानी खेळाडूंचे पथक मायदेशी परतले आहे. परदेशातील स्पर्धांमध्ये पाकिस्तानी खेळाडू वारंवार अशा प्रकारे गायब होण्याच्या घटनांमुळे क्रीडा वर्तुळातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.