फरिदाबाद : एका बाजूला पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असताना, दुसऱ्या बाजूला विद्यादानाच्या पवित्र भूमीत दिवसाढवळ्या घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण शैक्षणिक जगताला हादरवून सोडले आहे. हरियाणातील (Hariyana) फरिदाबादजवळील (Faridabad) सिकरौना येथील एका खासगी शाळेत कार्यरत असलेल्या संध्या नावाच्या महिला शिक्षिकेची एका माथेफिरू तरुणाने अतिशय अमानुषपणे हत्या केली. अवघ्या ३२ सेकंदांच्या कालावधीत ३४ वेळा चाकूने सपासप वार करून आरोपीने शिक्षिकेचा नृशंस बळी घेतला. या भयंकर आणि क्रूर कृत्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले असून कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
भेटण्याच्या बहाण्याने बोलावले अन् थेट गळ्यावर चालवला चाकू
फरीदाबाद (हरियाणा) के सिकरौना गांव स्थित एक निजी स्कूल में दिनदहाड़े एक सनसनीखेज वारदात सामने आई है।
यहां 21 वर्षीय स्टॉकर अमित ने 26 वर्षीय शिक्षिका संध्या की चाकू से गोदकर निर्मम हत्या कर दी।
आरोपी चेहरे पर कपड़ा बांधकर स्कूल पहुंचा और कर्मचारियों को झांसा दिया कि वह शिक्षिका… pic.twitter.com/9hZcNB9HQN
— Firoz Naik Mirza (@MrFirozKhan) August 4, 2026
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, शिक्षिका संध्या या दररोजप्रमाणे शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्यात मग्न होत्या. दरम्यान, तोंडाला रुमाल बांधून आलेल्या एका अनोळखी तरुणाने मुख्य प्रवेशद्वारावर येऊन संध्या मॅडमशी काम असल्याचे सांगितले. कर्मचारी निरोप घेऊन गेल्यानंतर संध्या या निरपराध भावनेने त्या तरुणाला भेटण्यासाठी गेटजवळ आल्या. मात्र, काही बोलण्यापूर्वीच किंवा परिस्थिती समजून घेण्यापूर्वीच त्या माथेफिरूने अचानक धारदार चाकू काढून थेट त्यांच्या गळ्यावर जीवघेणा हल्ला चढवला. संध्या यांनी जीव वाचवण्यासाठी आकांडतांडव करत बचाव करण्याचा प्रयत्न केला, परंतु नराधमाने त्यांना सावरण्याची कोणतीही संधी दिली नाही.
https://prahaar.in/2026/08/04/warning-issued-of-legal-action-and-property-attachment-for-non-payment-of-property-and-water-taxes/
मदतीला धावलेल्या संस्थाचालकालाही चाकूचा धाक
शाळेच्या आवारातून येणारे विदारक ओरडण्याचे आणि किंचाळण्याचे आवाज ऐकून शाळेचे संस्थाचालक अत्यंत सतर्कतेने मदतीसाठी गेटच्या दिशेने धावले. त्यांनी शिक्षिकेला त्या नराधमाच्या तावडीतून सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु रक्ताने माखलेल्या चाकूने त्या माथेफिरूने संस्थाचालकावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना धमकावले. आरोपीचे हे हिंसक रूप पाहून शाळेतील इतर कर्मचारी आणि उपस्थितांमध्ये प्रचंड घबराट पसरली अन् एकच पळापळ झाली. कोणाला काही समजण्याच्या आत, केवळ ३२ सेकंदांच्या कालावधीत ३४ भयंकर वार करून शिक्षिकेला रक्ताच्या थारोळ्यात पाडल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पोबारा केला.
CCTV फुटेजने उघड केला नराधमाचा भीषण कट
ही संपूर्ण हृदयद्रावक आणि थरारक घटना शाळेच्या मुख्य आवारात बसवलेल्या CCTV कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे. फुटेजमध्ये दिसल्यानुसार, चेहऱ्यावर रुमाल बांधलेला हा आरोपी काही वेळ आधीच शाळेत आला होता आणि अत्यंत सावधगिरीने संध्या यांची वाट पाहत उभा होता. शिक्षिका समोर येताच त्याने त्यांना बाहेर ओढून क्रूरतेचा कळस गाठला. घटनेची माहिती मिळताच फरिदाबाद पोलीस दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताची ओळख पटवून त्याला जेरबंद करण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.