Home महाराष्ट्र नाशिक Nashik News : अखेर चार दिवसानंतर अभिषेकचा मृतदेह सापडला; एकुलता एक मुलगा गमावल्याने आईचा काळीज चिरणारा आक्रोश

Nashik News : अखेर चार दिवसानंतर अभिषेकचा मृतदेह सापडला; एकुलता एक मुलगा गमावल्याने आईचा काळीज चिरणारा आक्रोश

0
Nashik News : अखेर चार दिवसानंतर अभिषेकचा मृतदेह सापडला; एकुलता एक मुलगा गमावल्याने आईचा काळीज चिरणारा आक्रोश
suicide

Nashik News : नाशिकच्या दाढेगावजवळील (Dadhegaon) वालदेवी नदीवरील पुलावरून पुराच्या पाण्यात २८ वर्षीय अभिषेक अनिल जाधव (Abhishek Anil Jadhav) वाहून गेला होता. चार दिवसांपासून याठिकाणी अभिषेकला शोधण्यासाठी शोधकार्य सुरु होते. अखेर चार दिवसांच्या शोध मोहिमेनंतर मंगळवारी सकाळी पुलाजवळील बंधाऱ्यालगत मृतदेह झाडाझुडपांमध्ये आढळून आला. अभिषेक हा एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

https://prahaar.in/2026/08/04/even-though-the-farmer-repaid-the-entire-loan-the-bank-did-something-it-shouldnt-have/

नेमकं काय घडलं ?

अभिषेक जाधव हा जय भवानी रोड, नाशिक रोड (Nashik Road) येथील रहिवासी होता. १ ऑगस्टला मुसळधार पावसामुळे वालदेवी नदीला (Valdevi River) पूर आला होता. या पुरात शनिवारी सायंकाळी पुलावरून जात असताना तो दुचाकीसह वाहून गेला होता. त्यानंतर अग्निशमन दल (fire brigade) आणि एनडीआरएफच्या (NDRF) जवानांकडून सलग चार दिवस त्याला शोधण्यासाठी शोधकार्य राबवण्यात येत होते. मात्र त्याचा शोध लागला नव्हता.

https://prahaar.in/2026/08/04/fraudsters-from-trimbakeshwar-robbed-a-woman-of-1-5-lakh-after-threatening-her/

आज सकाळी पुलाजवळील बंधार्‍याकडे काही कुत्रे वारंवार जात असल्याचे दोन महिलांच्या निदर्शनास आले. यावेळी संशय आल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता झाडाझुडपांमध्ये रेनकोट घातलेल्या अवस्थेत एक मृतदेह दिसला. त्यांनी तातडीने गावकऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर संजय सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. तोपर्यंत अग्निशमन दलाचे कर्मचारीही तेथे दाखल झाले. मृतदेहाजवळ मिळालेल्या ओळखपत्रावरून अभिषेकची ओळख पटली.

https://prahaar.in/2026/08/04/40000-bribe-for-a-positive-report/

घटनास्थळी आईचा काळीज चिरणारा आक्रोश

अभिषेकचे वडील यापूर्वीच मयत झाले असून तो आई शुभांगी जाधव यांच्यासोबत राहत होता. त्याला एक बहीण असून तिचे लग्न झालेले आहे. तो एबीपी कंपनीत कार्यरत होता. ड्युटी संपल्यानंतर याच मार्गाने घरी जात असताना ही दुर्घटना घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. एकुलता एक मुलगा (Son) गमावल्याने आई शुभांगी जाधव यांनी घटनास्थळी काळीज चिरणारा आक्रोश केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here