Home क्राईम Mumbai Crime : मुंबई विमानतळावर 16 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त; बँकॉकहून आलेल्या 19 वर्षीय तरुणाला अटक

Mumbai Crime : मुंबई विमानतळावर 16 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त; बँकॉकहून आलेल्या 19 वर्षीय तरुणाला अटक

0
Mumbai Crime : मुंबई विमानतळावर 16 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त; बँकॉकहून आलेल्या 19 वर्षीय तरुणाला अटक

मुंबई : मुंबईतील (Mumbai) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) सीमाशुल्क विभागाने मोठी कारवाई करत 16 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. या प्रकरणात राजस्थानातील अजमेर येथील 19 वर्षीय तरुणाला अटक (Arrest) करण्यात आली असून, तो आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करी रॅकेटसाठी वाहक म्हणून काम करत असल्याचा संशय आहे.

सीमाशुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, बँकॉकहून मुंबईत आलेल्या अजित कथत या प्रवाशावर पाळत ठेवण्यात आली होती. विमानतळावर उतरल्यावर त्याला आगमन विभागात अडवून चौकशी करण्यात आली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याच्या सामानाची सखोल तपासणी केली. (Drug Smuggling)

तपासणीदरम्यान त्याच्या ट्रॉली बॅगेत 16 प्लास्टिकच्या पॅकेटमध्ये भरलेला सुमारे 16 किलो वजनाचा हिरव्या रंगाचा सुका पालेदार पदार्थ आढळून आला. प्राथमिक तपासात हा पदार्थ हायड्रोपोनिक गांजा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी संपूर्ण माल जप्त केला. (Bangkok)

https://prahaar.in/2026/08/01/20000-bribe-demanded-for-assistance-in-a-pocso-case-surgana-police-sub-inspector-caught-in-acb-trap/

चौकशीदरम्यान आरोपीने आर्थिक मोबदल्याच्या बदल्यात हा अमली पदार्थ भारतात आणल्याची कबुली दिल्याची माहिती सीमाशुल्क विभागाने दिली आहे. त्याचा जबाब नोंदवल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. (Mumbai Police)

प्राथमिक तपासात या तस्करीमागे इतर काही व्यक्तींचाही सहभाग असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या रॅकेटमधील मुख्य सूत्रधार, मालाचा पुरवठादार, आर्थिक व्यवहार आणि भारतातील प्राप्तकर्ता यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.

दरम्यान, न्यायालयात आरोपीला हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.

https://prahaar.in/2026/08/01/public-works-minister-shivendrasinhraje-bhosale-inspected-palghar-which-has-been-battered-by-heavy-rainfall/

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अलीकडच्या काळात थायलंडमधील धोरणात्मक बदलांनंतर तेथून भारतात हायड्रोपोनिक गांजाची तस्करी वाढली आहे. विशेषतः बँकॉकहून येणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून व्हॅक्यूम-सील केलेल्या पॅकेटमध्ये अमली पदार्थ लपवून भारतात आणण्याचे प्रकार वाढल्याचे तपास यंत्रणांनी नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळांवरील तपासणी अधिक कडक करण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here