तिरुपती : दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर असलेला क्रिकेटपटू हार्दिक पांड्या सध्या चर्चेत आहे. अष्टपैलू हार्दिकने त्याची मैत्रीण महिका शर्मासोबत आंध्र प्रदेशमधील तिरुपती बालाजीचं अर्थात भगवान व्यंकटेश्वराचं दर्शन घेतलं. मंदिराच्या आवारात असतानाच क्रिकेटपटू हार्दिक पांड्यानं एक मोठा निर्णय घेतला. त्यानं केशदान करण्याचा निर्णय घेतला. डोक्यावरचे सगळे केस दान केले.
https://prahaar.in/2026/08/02/india-won-39-medals-at-the-glasgow-commonwealth-games-2026-the-closing-ceremony-will-feature-a-glimpse-of-ahmedabad-2030/
व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडीओंमध्ये क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि त्याची मैत्रीण महिका शर्मा एकमेकांसोबत दिसत आहेत. हार्दिकनं पांढऱ्या रंगाचा कुर्ता – पायजमा परिधान केला आहे. हार्दिकनं पूर्ण टक्कल केल्याचंही दिसत आहे. मंदिरात असतानाच हार्दिकने डोक्यावरचे सगळे केस दान केले. हार्दिक आणि महिकाने सुप्रभातम सेवेत भाग घेतला आणि भगवान व्यंकटेश्वराचा आशीर्वाद घेतला.
https://prahaar.in/2026/08/02/presidential-assent-granted-to-the-maharashtra-freedom-of-religion-bill-children-of-interfaith-marriages-will-now-take-the-mothers-religion/
भारताचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. तो संघात पुनरागमन करण्यासाठी संघर्ष करत आहे. जेव्हा हार्दिक दर्शनासाठी तिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात पोहोचला, तेव्हा त्याने पांढरा कुर्ता-पायजमा घातला होता. तसेच त्याने डोक्यावरचे सगळे केस दान केले होते. त्याच्या कपाळावर टिळाही लावला होता. त्याची प्रेयसी महिका शर्मा देखील हार्दिकसोबत होती, त्या दोघांनी मंदिरात जाऊन भगवान व्यंकटेश्वर स्वामींना प्रार्थना केली.
https://prahaar.in/2026/08/02/during-the-ashadhi-wari-the-lalpari-proved-to-be-a-trusted-companion-for-lakhs-of-devotees/
भारतीय संघाने २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी तयारी सुरू केली आहे. या तयारीत हार्दिक एक महत्त्वाचा खेळाडू आहे. फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्यास तो सप्टेंबर २०२६ पासून पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसण्याची शक्यता आहे. तो ०२५ च्या सुरुवातीला चॅम्पियन्स ट्रॉफीत न्यूझीलंड विरुद्ध खेळला होता. हाच त्याचा अंतिम एकदिवसीय सामना होता. या व्यतितिरित्त हार्दिक २०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळला होता. पण मागील काही दिवसांपासून दुखापतीमुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. आता तिरुपती बालाजीच्या दर्शनाच्या निमित्ताने तो नव्याने चर्चेत आला आहे.
View this post on Instagram
हार्दिक पांड्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी
- ११ कसोटी सामने – ५३२ धावा – एक शतक आणि चार अर्धशतके – एका डावात केलेल्या १०८ धावा ही सर्वोत्तम धावसंख्या – घेतले १७ बळी
- ९४ एकदिवसीय सामने – १९०४ धावा – ११ अर्धशतके – नाबाद ९२ धावा ही सर्वोत्तम धावसंख्या – घेतले ९१ बळी
- १३१ टी ट्वेंटी सामने – २१२८ धावा – ८ अर्धशतके – नाबाद ७१ ही सर्वोत्तम धावसंख्या – घेतले १०७ बळी