Home ब्रेकिंग न्यूज Ajit Doval : डोवाल यांच्या मार्गदर्शनात १३ बॉम्बस्फोटांचा उलगडा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून गौरव

Ajit Doval : डोवाल यांच्या मार्गदर्शनात १३ बॉम्बस्फोटांचा उलगडा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून गौरव

0
Ajit Doval : डोवाल यांच्या मार्गदर्शनात १३ बॉम्बस्फोटांचा उलगडा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून गौरव
13 bomb blast cases solved under Doval's guidance; commended by Union Home Minister Amit Shah.

पुणे : लोकमान्य टिळक यांच्या १०६ व्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यात आयोजित विशेष समारंभात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रतिष्ठित ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी अजित डोवाल यांचा गौरव करताना अमित शहा म्हणाले की, मी गुजरातचा गृहमंत्री असताना डोवाल यांच्या मार्गदर्शनामुळे १३ बॉम्बस्फोटांचा उलगडा झाल्याचे सांगितले.

https://prahaar.in/2026/08/02/acting-on-the-advice-of-uncle-football-enthusiast-jadumani-stepped-into-the-boxing-ring-and/

या सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तथा पुरस्काराचे मानकरी अजित डोवाल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक, डॉ. गीताली टिळक आणि आमदार डॉ. प्रणिती टिळक आदी मान्यवर उपस्थित होते.

https://prahaar.in/2026/08/02/charges-framed-against-sachin-vaze-and-pradeep-sharma-momentum-gathers-in-the-antilia-explosives-case/

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा देत राष्ट्रवाद, शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक जागृतीचा भक्कम पाया रचला. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” हा त्यांचा विचार आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देत असून, विकसित आणि सक्षम भारताच्या निर्मितीसाठी मार्गदर्शक ठरत आहे, असेही शहा यांनी म्हटले.

https://prahaar.in/2026/08/02/friendship-day-special-5-simple-questions-that-will-reveal-your-true-friend/

एका धुरंधराकडून दुसऱ्या धुरंधराचा सत्कार : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित डोवाल मांना राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातील ‘चाणक्य’ संबोधले, तर अमित शहांच्या उपस्थितीवर भाष्य करताना “एका धुरंधराला पुरस्कार देण्यासाठी दुसरे धुरंधर आले आहेत,” असे गौरवोद्‌गार काढले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले को, संपूर्ण जीवन राष्ट्राला समर्पित करणाऱ्या डोवाल यांना हा पुरस्कार मिळत असल्याचा आनंद आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रातील चाणक्य असलेल्या डावाल घांना सन्मानित करण्यासाठी राजकीय क्षेत्रातील चाणक्य असलेले अमित शहा पुण्यात उपस्थित राहणे हा एक उत्तम योग आहे. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित डोवाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केल्यानंतर देशाच्या सुरक्षेचे धोरण पूर्णपणे बदलल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

https://prahaar.in/2026/08/02/daily-wage-laborers-son-becomes-the-nations-pride-praveen-chithravel-wins-historic-silver-medal-in-triple-jump/

पुण्याशी असलेले भावनिक नाते

सत्काराला उत्तर देताना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यानी पुण्यात येऊन हा पुरस्कार स्वीकारताना आनंद व्यक्त केला. माझे वडील सैन्यात होते. मी लहान असताना आम्ही जवळपास दीड वर्षे पुण्यात राहिलो होतो. माझी आई मला दर मंगळवारी न चुकता चतुःशृंगी देवीच्या मंदिरात घेऊन जायची त्यानंतर वडिलांची बदली झाल्यामुळे पुन्हा पुण्यात येण्याचा योग आला नाही; परंतु बरोबर ७६ वर्षानंतर आज थेट लोकमान्य टिळकांच्या नावाचा मानाचा पुरस्कार घेण्यासाठी पुण्यात येण्याचे भाग्य मला लाभले, याचा मला सार्थ अभिमान आहे.” अशा शब्दांत त्यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here