Home क्राईम Nashik Crime : अखेर ‘त्या’ शिक्षिकेच्या हत्येचा लागला छडा, प्रेमसंबंध अन्…

Nashik Crime : अखेर ‘त्या’ शिक्षिकेच्या हत्येचा लागला छडा, प्रेमसंबंध अन्…

0
Nashik Crime : अखेर ‘त्या’ शिक्षिकेच्या हत्येचा लागला छडा, प्रेमसंबंध अन्…
Chhatrapati Sambhajinagar Crime

Nashik Crime News : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात एका शिक्षिकेच्या हत्येने तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. अखेर शिक्षिकेच्या हत्येचा उलगडा झाला आहे. हत्या झालेल्या शिक्षिकेचे नाव असून संगीता मारुती चंदनशिवे असून याप्रकरणी वाडिवऱ्हे पोलिसांनी (Wadivarhe Police) चार आरोपींना अटक केली आहे. (Igatpuri Crime News)

https://prahaar.in/2026/08/01/cctv-surveillance-at-garbage-prone-hotspots-in-mumbai-punitive-action-against-those-dumping-waste/

नेमकं प्रकरण काय ?

मिळालेल्या माहितीनुसार, मृत संगीता चंदनशिवे या कल्याण येथील मोहने परिसरात राहत होत्या. त्या वेणूबाई आंबो पावसे विद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्या एलआयसी एजंट म्हणूनही कार्यरत होत्या. १४ जुलैला त्या घरातून बाहेर पडल्या त्या घरी परातल्याच नाही. त्यामुळे त्यांच्या भावाने कोळसेवाडी पोलिस ठाण्यात (Kolsewadi Police Station) बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. १६ जुलै रोजी एसएमबीटी मेडिकल कॉलेज (SMBT Medical College) प्रवेशद्वाराजवळील पार्किंगमध्ये त्यांचा मृतदेह आढळला होता. आधारकार्डाच्या आधारे मृतदेहाची ओळख पटली. (Igatpuri Crime News)

https://prahaar.in/2026/08/01/friendship-day-2026-when-is-friendship-day-celebrated-and-why/

तपासादरम्यान पोलिसांनी मोबाइलच्या कॉल डिटेल रेकॉर्डची छाननी केली, त्यावेळी शेवटचे संभाषण संतोष जाधव याच्यासोबत झाल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या चौकशीत दिगंबर आव्हाड, तुषार रत्नपारखी आणि विनोद पांडे यांच्या सहभागाची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपींना अटक केली. पोलिस तपासात दिगंबर आव्हाड आणि संगीता चंदनशिवे यांच्यात २००४ पासून प्रेमसंबंध होते. दरम्यान आव्हाडने दुसऱ्या महिलेशी विवाह केला. मात्र संगीता लग्नासाठी सातत्याने आग्रह करत होत्या. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने संगीता यांच्या नावावरील तीन फ्लॅट स्वतःच्या नावावर करण्याची किंवा मृत्युपत्र करून देण्याची अट घालत काही कागदपत्रे, कोऱ्या कागदांवर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या होत्या. (Igatpuri Crime News)

https://prahaar.in/2026/08/01/have-you-seen-the-gold-ornaments-that-were-donated/

लग्नाच्या बहाण्याने नेले अन्…

संशयित आरोपींनी संगीता यांना १५ जुलै रोजी मंदिरात लग्न करण्याचे आमिष दाखवून भाड्याच्या कारने आसनगावहून बाहेर नेले होते. सिन्नर एमआयडीसीमार्गे नाशिककडे आणून जेवणानंतर दोन संशयितांना उतरवून मुख्य संशयित आरोपी दिगंबर आव्हाड, चालक तुषार रत्नपारखी आणि संगीता चंदनशिवे हे एसएमबीटी मेडिकल कॉलेजकडे (SMBT Medical College) आले. मेडिकल कॉलेजबाहेरील पार्किंगमध्ये वाहन उभे करून चालकाला चहा आणण्यासाठी पाठविले. त्याच वेळी लग्नाच्या विषयावर दोघांमध्ये वाद झाल्यानंतर दिगंबर आव्हाडने मारहाण करून कपड्याने तोंड दाबत संगीता चंदनशिवे यांची हत्या केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. वाडीवऱ्हे पोलिस (Wadivarhe Police) याप्रकरणात अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here