Home ताज्या घडामोडी Skin Care : महागड्या क्रीम्स विकत घेण्यापेक्षा; तजेलदार त्वचेसाठी करा हे घरगुती उपाय

Skin Care : महागड्या क्रीम्स विकत घेण्यापेक्षा; तजेलदार त्वचेसाठी करा हे घरगुती उपाय

0
Skin Care : महागड्या क्रीम्स विकत घेण्यापेक्षा; तजेलदार त्वचेसाठी करा हे घरगुती उपाय
Skincare

चमकदार आणि निरोगी त्वचा सगळ्यांनाच हवी असते पण वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर सुरकुत्या दिसणे, त्वचा निस्तेज होणे या समस्या प्रकर्षाने जाणवतात. वातावरणातील प्रदूषण, चुकीच्या सवयी, जीवनशैलीतील बदल, अश्या अनेक कारणांमुळे त्वचेच्या समस्या निर्माण होतात.

त्वचा निरोगी नसेल तर आत्मविश्वास ढासळतो म्हणून अनेक जण महागडे उपचार, प्रॉडक्ट्स यांवर अनावश्यक खर्च करतात. परंतु हे सगळ्यांनाच परवडणारे नसते. अशा परिस्थितीत, तुम्ही नैसर्गिक उपाय करून बघू शकता. घरगुती उपायसुद्धा अनेकवेळा फायदेशीर ठरतात फक्त रासायनिक क्रीम्स पेक्षा थोडा अधिक वेळ लागू शकतो.

https://prahaar.in/2026/08/01/who-is-asmita-dey-first-ever-indian-judo-gold-win-in-glasgow-commomwealth-games/

कोणत्या घरगुती साहित्यापासून Skin Care करू शकतो?

तांदळाचे पीठ
अळशी (जवस)
कच्चे दूध
कोरफड जेल
व्हिटॅमिन ई कॅप्सूल

https://prahaar.in/2026/08/01/ashok-kharat-remanded-to-police-custody-for-this-many-days/

घरगुती कोलेजन क्रीम कशी बनवावी ?

२ मोठे चमचे अळशी (जवस) पाण्यात ७-८ मिनिटे उकळा. पाणी घट्ट होऊन जेलीसारखे झाल्यावर गॅस बंद करा. हे मिश्रण चाळणीतून गाळून घ्या. नंतर, कच्च्या दुधात १ मोठा चमचा तांदळाचे पीठ घालून चांगले मिसळा. या मिश्रणात जवसाची जेली घाला आणि त्याला मलईसारखा घट्टपणा येईपर्यंत शिजवा. थोडे थंड झाल्यावर, त्यात १ व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि १ छोटा चमचा कोरफडीचा गर घाला. तुमची कोलेजन क्रीम तयार आहे.

या क्रीम चे फायदे काय होतील :

या घरगुती कोलेजन क्रीमच्या नियमित वापरामुळे त्वचा निरोगी राहते, सुरकुत्या कमी होतात, त्वचा फ्रेश दिसते. चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. तथापि, त्वचेचे वृद्धत्व कमी करण्यासाठी, तुम्ही तुमच्या आहाराकडे आणि जीवनशैलीकडेही लक्ष दिले पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here