Home ब्रेकिंग न्यूज Health Facilities : स्वातंत्र्यदिनी राज्यभरात विक्रमी संख्येने आरोग्य संस्थांचे लोकार्पण

Health Facilities : स्वातंत्र्यदिनी राज्यभरात विक्रमी संख्येने आरोग्य संस्थांचे लोकार्पण

0
Health Facilities : स्वातंत्र्यदिनी राज्यभरात विक्रमी संख्येने आरोग्य संस्थांचे लोकार्पण

मंत्री प्रकाश आबिटकर; ग्रामीण आरोग्य सेवेला नवी ताकद मिळणार

मुंबई : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात प्रथमच विक्रमी संख्येने नवीन आरोग्य संस्थांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. ८० टक्क्यांपेक्षा जास्त बांधकाम पूर्ण झालेल्या संस्थांना युद्धपातळीवर कार्यान्वित करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे ग्रामीण, दुर्गम आणि शहरी भागातील आरोग्य यंत्रणेला मोठी ताकद मिळणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर (Health Minister Prakash Abitkar) यांनी शनिवारी दिली.

https://prahaar.in/2026/08/01/what-if-those-who-speak-about-rights-misuse-them-what-exactly-did-nsa-ajit-doval-say-about-the-youth/

राज्यातील उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ट्रॉमा केअर युनिट्स आणि स्त्री रुग्णालये यांसारख्या विविध नवीन वास्तू नागरिकांच्या सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. जत, घनसावंगी, अंबड, बदलापूर, मोखाडा, डहाणू, सांगोला, ब्रह्मपुरी, वाशीम, धुळे, चंद्रपूर, पुणे, जळगाव, बीड, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत राष्ट्रीय आरोग्य अभियान व १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून उभारण्यात आलेले हे प्रकल्प सुरू होत आहेत. आवश्यक वैद्यकीय यंत्रसामग्री, फर्निचर व मनुष्यबळाची पूर्तता करण्यात आली असून स्थानिक स्तरावरच तातडीचे व दर्जेदार उपचार उपलब्ध होणार आहेत.

https://prahaar.in/2026/08/01/devendra-fadnavis-to-present-an-award-to-a-stalwart-fadnavis-speech-in-pune-sparks-a-major-buzz-find-out-exactly-what-the-chief-minister-said/

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य सेवा सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आल्याचे मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. अनेक वर्षांपासून रखडलेल्या आरोग्य प्रकल्पांना प्राधान्याने पूर्ण करण्यात आले असून उर्वरित संस्थांचे लोकार्पण ‘आरोग्य संवाद’ यात्रेदरम्यान केले जाईल. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी होणारे हे लोकार्पण राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला बळ देणारा ऐतिहासिक टप्पा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here