Nashik : भारतीय हवामान विभागाने नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांसाठीआजही पावसाचा अलर्ट दिलेला आहे. पावसाचा इशारा दिल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सप्तश्रृंगगड ते नांदुरी घाट रस्ता (Saptashrunggad to Nanduri Ghat Road) तात्पुरता बंद करण्यात आला आहे. शुक्रवार, दि. ३१ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता हवामान विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार प्रशासनाने हा निर्णय घेतला.
https://prahaar.in/2026/08/01/lokmanya-tilak-speech-prepared-speech-draft-for-lokmanya-tilaks-death-anniversary/
जिल्हाधिकारी नाशिक, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कळवण आणि तहसीलदार कळवण यांच्या सूचनेनुसार श्री सप्तश्रृंगगड निवासिनी देवी ट्रस्टने (Shri Saptashrungagad Nivasini Devi Trust) ३१ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून घाटमार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी आणि भाविकांच्या प्रवासासाठी बंद केला आहे.
https://prahaar.in/2026/08/01/changes-to-nashiks-central-traffic-today-which-routes-will-be-closed/
हवामान परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतरच वाहतूक सुरू होणार
प्रशासनाच्या माहितीनुसार, शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी हवामान परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आणि परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पुढील आदेशानुसार घाट रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. दरम्यान, भक्तनिवास विभागात आरक्षण केलेल्या भाविकांनी पुढील प्रशासकीय सूचना मिळेपर्यंत अत्यावश्यक कारणाशिवाय भक्तनिवास परिसराच्या बाहेर पडू नये तसेच घाटमार्गावर प्रवास टाळावा, असे आवाहन श्री सप्तश्रृंगगड निवासिनी देवी ट्रस्टकडून करण्यात आले आहे. प्रशासनाने भाविकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि स्वतःची सुरक्षितता जपावी, असे सांगितले आहे.