Home ब्रेकिंग न्यूज Bhai Jagtap : AI-जनरेटेड व्हिडिओ प्रकरणी काँग्रेस नेते भाई जगताप यांच्याविरोधात गुन्हा; महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून तपास सुरू

Bhai Jagtap : AI-जनरेटेड व्हिडिओ प्रकरणी काँग्रेस नेते भाई जगताप यांच्याविरोधात गुन्हा; महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून तपास सुरू

0
Bhai Jagtap : AI-जनरेटेड व्हिडिओ प्रकरणी काँग्रेस नेते भाई जगताप यांच्याविरोधात गुन्हा; महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई: दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने कथित AI-जनरेटेड बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याच्या आरोपावरून काँग्रेस नेते भाई जगताप (Bhai Jagtap) यांच्याविरोधात महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सायबरच्या नोडल सायबर पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 0063/2026 नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे सोशल मीडिया सहसंयोजक निखिल भामरे यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर प्राथमिक चौकशी करून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 353(2) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (Cyber Police)

https://prahaar.in/2026/08/01/this-theatre-named-after-annabhau-sathe-represents-an-act-of-dedication-to-society/

तक्रारीनुसार, @Bhaijagtap1 या एक्स (X) हँडलवरून दिल्ली पोलिसांचे डीसीपी सुमित झा यांच्या नावाने असल्याचा भास निर्माण करणारा AI-आधारित व्हिडिओ प्रसारित करण्यात आला होता. संबंधित व्हिडिओची पडताळणी केल्यानंतर तो बनावट असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. (Delhi Police)

तक्रारीमध्ये असा आरोप करण्यात आला आहे की, या व्हिडिओच्या माध्यमातून समाजात संभ्रम निर्माण करणे आणि जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. (Fake Video)

दरम्यान, या प्रकरणात न्यायालयीन किंवा तपास यंत्रणांकडून अंतिम निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. तपास यंत्रणा सोशल मीडिया पोस्ट, संबंधित डिजिटल पुरावे आणि अन्य तांत्रिक बाबींची पडताळणी करत आहेत. (Congress)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here