Home टेक्नॉलॉजी Nagpur Researcher : नागपूरच्या संशोधकांचा विज्ञानाच्या विश्वात क्रांतिकारी शोध; आता रात्रीच्या अंधारातही होणार सौरऊर्जा निर्मिती!

Nagpur Researcher : नागपूरच्या संशोधकांचा विज्ञानाच्या विश्वात क्रांतिकारी शोध; आता रात्रीच्या अंधारातही होणार सौरऊर्जा निर्मिती!

0
Nagpur Researcher : नागपूरच्या संशोधकांचा विज्ञानाच्या विश्वात क्रांतिकारी शोध; आता रात्रीच्या अंधारातही होणार सौरऊर्जा निर्मिती!
solar energy generation will now be possible even in the darkness of night

NAGPUR : सौरऊर्जा निर्मितीसाठी आता कडक उन्हाची किंवा प्रखर सूर्यप्रकाशाची गरज पडण्याची मार्यादा संपुष्टात आली आहे. नागपूरच्या संशोधकांनी विज्ञानाच्या क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल टाकत चक्क रात्रीच्या अंधारात आणि ढगाळ वातावरणातही चोवीस तास सौरऊर्जा निर्माण करण्याचे अनोखे तंत्रज्ञान यशस्वीपणे विकसित केले आहे. या अप्रतिम संशोधनामुळे भविष्यातील वीज टंचाईवर मोठी मात करणे शक्य होणार असून, या आंतरराष्ट्रीय शोधाची गंभीर दखल घेत ब्रिटनने या महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानाला ‘युके डिझाइन’चे (UK Design) पेटंट प्रमाणपत्रही बहाल केले आहे.

https://prahaar.in/2026/07/31/historic-performance-by-indias-lovepreet-singh-in-glasgow-won-a-silver-medal-at-the-commonwealth-games/

नागपूर विद्यापीठाच्या संशोधकांचा अभूतपूर्व प्रयोग

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय ढोबळे आणि लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाचे (LITU) प्राध्यापक डॉ. विजय पावडे यांनी संयुक्तपणे हे नाविन्यपूर्ण संशोधन साकारले आहे. बाजारात सध्या दोन्ही बाजूने ऊर्जा निर्माण करू शकणारे ‘बायफेशियल’ सोलर पॅनल उपलब्ध असले, तरी सूर्यप्रकाश कमी झाल्यावर किंवा रात्र झाल्यावर त्यांची वीज निर्मिती पूर्णपणे खंडित होते. या मुख्य समस्येवर मात करण्यासाठी संशोधकांनी बायफेशियल सोलर पॅनलच्या वर आणि खाली विशेष स्वरूपाचे एलईडी (LED) दिवे बसवण्याचा अनोखा मार्ग शोधला आहे.

https://prahaar.in/2026/07/31/hamas-trumps-major-announcement-israeli-troops-to-withdraw-from-gaza-after-the-complete-disarmament-of-hamas/

अशी होते सूर्याशिवाय रात्रीच्या वेळी वीज निर्मिती

या स्वयंचलित यंत्रणेनुसार, दिवसाच्या वेळी वाऱ्यापासून मिळणारी पवनऊर्जा साठवून ठेवली जाते. रात्री सूर्यप्रकाश मावळताच एका आधुनिक सेन्सरच्या मदतीने हे एलईडी दिवे आपोआप सुरू होतात. या दिव्यांच्या कृत्रिम प्रकाशामुळे सोलर पॅनल रात्रीच्या अंधारातही पुन्हा सक्रिय होतात आणि सातत्याने वीज तयार करू लागतात. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रक्रियेसाठी बाहेरील कोणत्याही अतिरिक्त विजेची गरज भासत नाही. ही यंत्रणा स्वतःच निर्माण केलेल्या ऊर्जेवर पूर्णपणे मोफत आणि स्वयंचलित पद्धतीने अखंडितपणे काम करते.

https://prahaar.in/2026/07/31/historic-feat-in-glasgow-indias-seema-kaliraman-wins-bronze-medal-at-the-commonwealth-games/

भविष्यातील ऊर्जा संकटावर प्रभावी उपाय

पारंपरिक ऊर्जा स्त्रोत दिवसेंदिवस मर्यादित होत चालल्यामुळे, कृत्रिम प्रकाशाच्या माध्यमातून रात्रंदिवस अखंड वीज तयार करणारे हे तंत्रज्ञान भविष्यात ऊर्जा क्षेत्रासाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे. या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सर्वसामान्य नागरिकांच्या घरांचे विजेचे बिल शून्यावर आणणे, तसेच उद्योगधंदे आणि रस्त्यांवरील दिव्यांना २४ तास मोफत वीज पुरवणे शक्य होणार आहे. या जागतिक पातळीवरील महत्त्वपूर्ण यशाबद्दल नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्यासह शैक्षणिक व वैज्ञानिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी दोन्ही संशोधकांचे विशेष अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here