Home ब्रेकिंग न्यूज Arbaz Shaikh : अभिनेता अरबाज शेखवर दुःखाचा डोंगर; वडील अस्लम शेख यांचे उपचारादरम्यान निधन; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली होती आर्थिक मदत

Arbaz Shaikh : अभिनेता अरबाज शेखवर दुःखाचा डोंगर; वडील अस्लम शेख यांचे उपचारादरम्यान निधन; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली होती आर्थिक मदत

0
Arbaz Shaikh : अभिनेता अरबाज शेखवर दुःखाचा डोंगर; वडील अस्लम शेख यांचे उपचारादरम्यान निधन; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली होती आर्थिक मदत

ब्रेन हॅमरेजमुळे महिनाभर सुरू होती उपचारांची झुंज; मदतीसाठी केलेला भावनिक व्हिडिओ ठरला होता चर्चेचा विषय

‘सैराट’ चित्रपटातून लोकप्रिय झालेला अभिनेता अरबाज शेख याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे वडील अस्लम शेख यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले. ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर गेल्या महिनाभरापासून सोलापूरमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतानाच आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर विविध स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. (Arbaz Shaikh)

https://prahaar.in/2026/07/30/ramayan-movie-ramayan-trailer-released-ranbir-kapoor-to-appear-in-a-dual-role-a-spine-tingling-moment/

काही दिवसांपूर्वी अरबाज शेखने वडिलांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची आणि योग्य वैद्यकीय उपचारांची विनंती करत सोशल मीडियावर भावनिक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये त्याने सोलापूरमधील नोबेल हॉस्पिटलवर मेडिकलमधूनच औषधे खरेदी करण्याची सक्ती केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) संबंधित मेडिकल दुकानांवर तपासणी करून कारवाई केली होती. (Sairat Movie)

अरबाजच्या व्हिडिओची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला होता. शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या समन्वयातून सोलापूरमधील डॉ. वळसंगकर हॉस्पिटलने उपचाराची जबाबदारी स्वीकारली होती. डॉ. अश्विन वळसंगकर यांनी आवश्यक ती वैद्यकीय मदत देण्याचे आश्वासन दिले होते. (Eknath Shinde)

अस्लम शेख यांच्यावर सुरुवातीला सोलापूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मेंदूविकारामुळे त्यांची प्रकृती गंभीर होती. वडिलांना वाचवण्यासाठी अरबाजने सर्वतोपरी प्रयत्न केले. “मला माझ्या वडिलांना वाचवायचं आहे,” असे म्हणत त्याने अश्रूंनी भरलेला व्हिडिओ शेअर केला होता. मात्र, अखेर त्यांच्या मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. (Arbaz Shaikh)

अस्लम शेख यांच्या निधनामुळे शेख कुटुंबावर शोककळा पसरली असून, चाहत्यांसह चित्रपटसृष्टीतील अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here