Home महाराष्ट्र नाशिक Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्यातील ‘या’ भागात उद्या मुसळधार बरसणार ! भारतीय हवामान विभागाचा इशारा

Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्यातील ‘या’ भागात उद्या मुसळधार बरसणार ! भारतीय हवामान विभागाचा इशारा

0
Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्यातील ‘या’ भागात उद्या मुसळधार बरसणार ! भारतीय हवामान विभागाचा इशारा
Maharshtra Rain

Nashik Rain Update : भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी (दि.३१) नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण भागात म्हणजेच सिन्नर (Sinnar), इगतपुरी (Igatpuri) व त्रंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासन पूर्णपणे ‘अलर्ट मोड’वर आले आहे. संभाव्य पूरस्थिती, दरडी कोसळण्याच्या घटना आणि जीवितहानी टाळण्यासाठी सर्व विभागांनी युद्धपातळीवर तयारी करावी असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. (Nashik Rain Update)

https://prahaar.in/2026/07/30/administration-on-alert-in-nashik-following-earthquake/

संबंधित विभागांनी २४ तास सतर्क रहावे

आदेश देताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (District Collector Ayush Prasad) यांनी सांगितले की, मुक्त पाणलोट क्षेत्रातून येणारा अतिरिक्त पाऊस सुरक्षितपणे सामावून घेण्यासाठी सर्व धरणांमध्ये आवश्यक बफर साठा राखावा, तसेच पाणीसाठ्याचे तासागणिक निरीक्षण करून विसर्गाचे नियोजन वेळेत करावे. नदी-नाल्यांवरील कमी उंचीचे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन संबंधित विभागांनी २४ तास सतर्क राहावे. (Nashik Rain Update)

गरज भासल्यास वाहतूक तातडीने बंद करून पर्यायी व्यवस्था करावी, जेणेकरून कोणतीही दुर्घटना घडणार नाही. शहर आणि ग्रामीण भागातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना (Local self-government bodies) पावसाळी नाले, गटारे आणि सांडपाणी वाहिन्यांमधील प्लास्टिक व इतर अडथळे तातडीने हटविण्याचे आदेश देण्यात आले. तसेच सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितील तात्काळ प्रतिसाद देण्यास तयार राहावे, असेही त्यांनी बजावले. (Nashik Rain Update)

https://prahaar.in/2026/07/30/nashik-news-father-takes-drastic-step-in-grief-over-daughters-absence/

गरोदर महिलांना रुग्णालयात हलवण्याचे निर्देश

मुसळधार पावसाच्या अंदाजानंतर आरोग्य विभागालाही विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ४ ऑगस्टपूर्वी प्रसूती अपेक्षित असलेल्या सर्व गरोदर महिलांची (Pregnant Women) माहिती गोळा करून त्यांना पूर्वनियोजनानुसार शासकीय किंवा मान्यताप्राप्त रुग्णालयात दाखल करण्या कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींमधील नागरिकांना त्वरित सुरक्षितस्थळी स्थलांतरित करावे, तसेच दरडप्रवण आणि संवेदनशील भागांवर सातत्याने नज ठेवून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देशही संबंधित विभागांना देण्यात आले आहे.

https://prahaar.in/2026/07/30/anger-over-the-daughter-eloping-and-getting-married/

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

सध्या घाबरण्याचे किंवा काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र, अलीकडे जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांच्चर पार्श्वभूमीवर प्रत्येकाने अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असून, सर्व यंत्रणा समन्वयाने कार्यरत आहेत नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here