Home ब्रेकिंग न्यूज Dattatray Bharne : एकही पात्र शेतकरी १०० टक्के कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही

Dattatray Bharne : एकही पात्र शेतकरी १०० टक्के कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही

0
Dattatray Bharne : एकही पात्र शेतकरी १०० टक्के कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही

 कृषिमंत्री दत्ता भरणे; ऑगस्टमध्ये १६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर होणार

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील एकाही पात्र शेतकऱ्याला कर्जमाफीच्या लाभापासून वंचित ठेवले जाणार नाही. कर्जमाफीची दुसरी यादी तयार झाली असून ऑगस्ट महिन्यात १६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध केली जातील, अशी घोषणा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गुरुवारी केली. तसेच बँकांच्या ‘हेअरकट’ (आर्थिक तडजोड) मुद्यावरून शेतकऱ्यांनी अजिबात घाबरण्याचे कारण नाही, असे स्पष्ट करत राज्य सरकार आणि बँकांमधील या प्रक्रियेचा शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीवर कोणताही परिणाम होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. (Dattatray Bharne)

https://prahaar.in/2026/07/30/ajinkya-rahane-retirement-ajinkya-rahane-bids-farewell-to-international-cricket-announces-retirement-by-sharing-an-emotional-video/

पाच जिल्ह्यांतील १६ लाख ९६ हजार शेतकरी खात्यांची दुसरी यादी तयार करण्यात आली असून सर्व माहिती महाआयटी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. सर्व पात्र शेतकऱ्यांना ‘युनिक आयडी’ देण्यात आला आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जाईल, असे कृषिमंत्र्यांनी सांगितले.कर्जमाफीच्या अंमलबजावणीदरम्यान बँकांकडून ‘हेअरकट’च्या नावाखाली अडून बसण्याचे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या होत्या. यावर स्पष्टीकरण देताना कृषिमंत्र्यांनी सांगितले की, ‘हेअरकट’ म्हणजे थकीत कर्जाचा किती वाटा राज्य सरकार उचलणार आणि किती हिस्सा बँक सोडून देणार, याबाबतची राज्य सरकार आणि बँकांमधील अंतर्गत आर्थिक तडजोड आहे. १ वर्षापर्यंत थकीत कर्जावर सरकार ८५ टक्के तर बँक १५ टक्के बोजा सहन करते; तर ४ वर्षांपेक्षा जास्त जुन्या थकीत कर्जावर सरकार ३५ टक्के आणि बँका ६५ टक्के वाटा उचलतात. या सूत्राचा शेतकऱ्यांच्या मूळ कर्जमाफीवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही आणि त्यांना १०० टक्के कर्जमाफी मिळेल. (Dattatray Bharne)

https://prahaar.in/2026/07/30/kirti-kulhari-bollywood-actress-falls-victim-to-cybercrime-bank-account-emptied-in-mere-minutes/

५६ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार

राज्यभरातील एकूण ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे सरकारचे ध्येय असून या योजनेसाठी ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. चालू पावसाळी अधिवेशनातही यासाठी २० हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद मंजूर करण्यात आली आहे. यापूर्वी प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांची मदत मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना आता सुधारित निर्णयानुसार २ लाख रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषिमंत्र्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here