Home ब्रेकिंग न्यूज Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या आगमनाची चाहूल! मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळांकडून गणेशोत्सव २०२६ च्या तयारीला विधिवत सुरुवात

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या आगमनाची चाहूल! मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळांकडून गणेशोत्सव २०२६ च्या तयारीला विधिवत सुरुवात

0
Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या आगमनाची चाहूल! मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळांकडून गणेशोत्सव २०२६ च्या तयारीला विधिवत सुरुवात

मुंबई : अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सव २०२६च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेश मंडळांनी पारंपरिक धार्मिक विधींनी उत्सवाच्या तयारीला सुरुवात केली आहे. लालबागचा राजा, मुंबईचा राजा, चिंतामणी आणि तेजुकाया या मानाच्या गणेश मंडळांमध्ये विविध पूजाविधी पार पडत असून बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (Ganeshotsav 2026)

मुंबईचा राजा : ९८ व्या वर्षाची भक्तिमय सुरुवात

लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाचा ‘मुंबईचा राजा’ यंदा आपल्या ९८ व्या वर्षात पदार्पण करत आहे. अशातच गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर मुंबईच्या राज्याचा पाद्यपूजन विधी सोहळा पार पडला. बाप्पाच्या चरणांचे पूजन करून गणेशोत्सवाच्या तयारीचा श्रीगणेशा करण्यात आला. गेली जवळपास शतकभर सुरू असलेली ही परंपरा भक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक मानली जाते. (Ganeshotsav 2026)

https://prahaar.in/2026/07/30/partha-pawar-kainat-dhar-partha-pawar-and-kainat-dhars-grand-engagement-ceremony-took-place-in-the-presence-of-dignitaries/

१०७ वर्षांच्या परंपरेला सलाम; चिंतामणी मंडळात पाटपूजन

चिंतामणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा १०७ व्या वर्षात प्रवेश केला आहे. मंडळात पाटपूजन विधी पार पडला. ज्या ठिकाणी गणरायाची प्रतिष्ठापना होणार आहे, त्या स्थानाचे पूजन करून उत्सवाच्या तयारीला शुभारंभ करण्यात आला. (Ganeshotsav 2026)

तेजुकाया मंडळातही पाद्यपूजन :

मुंबईतील आणखी एक मानाचे तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ याठिकाणीही पारंपरिक पाद्यपूजन विधी संपन्न झाला. यानंतर सजावट, देखावे, मूर्ती निर्मिती आणि इतर तयारीला वेग आला आहे. (Ganeshotsav 2026)

लालबागच्या राजाची ९३ व्या वर्षाची तयारी सुरू :

देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाच्या ९३ व्या वर्षाच्या उत्सवाची तयारी जून महिन्यातच सुरू केली आहे. ९ जून २०२६ रोजी पहाटे गणेश मुहूर्त पूजन पार पडले. मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे Famous Ganesh Pandalsयांच्या उपस्थितीत हा विधी झाला. यावेळी देणगी पावती पुस्तकांचे पूजनही पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. मंडळाचे खजिनदार मंगेश दत्ताराम दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली हा विधी पार पडला. (Ganeshotsav 2026)

https://prahaar.in/2026/07/29/prasad-oak-recipients-announced-for-the-chitrapati-v-shantaram-and-raj-kapoor-lifetime-achievement-and-special-contribution-awards/

गणेश गल्लीत यंदा ‘वैष्णवांची वारी’ची भव्य सजावट :

यंदा गणेश गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आपल्या सजावटीसाठी ‘महाराष्ट्रातील संत परंपरा – वैष्णवांची वारी’ हा आगळावेगळा विषय निवडला आहे. वारकरी संप्रदाय, संत परंपरा आणि भक्तीचा संदेश देणारा देखावा यंदा भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. (Ganeshotsav 2026)

१४ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाची धामधूम :

यंदाचा गणेशोत्सव १४ सप्टेंबर २०२६ (गणेश चतुर्थी) पासून सुरू होणार असून २५ सप्टेंबर २०२६ (अनंत चतुर्दशी) रोजी विसर्जन सोहळ्याने सांगता होणार आहे. मुंबईतील प्रमुख गणेश मंडळांमध्ये तयारीला वेग आला असून, देखावे, रोषणाई, सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे यंदाचा गणेशोत्सवही नेहमीप्रमाणे भव्य आणि भक्तिमय वातावरणात साजरा होणार असल्याचे चित्र दिसत आहे. (Ganeshotsav 2026)

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here