Home क्राईम Mallikarjun Kharge : पंजाबच्या न्यायालयाकडून मल्लिकार्जुन खरगे यांच्याविरोधात वॉरंट जारी

Mallikarjun Kharge : पंजाबच्या न्यायालयाकडून मल्लिकार्जुन खरगे यांच्याविरोधात वॉरंट जारी

0
Mallikarjun Kharge : पंजाबच्या न्यायालयाकडून मल्लिकार्जुन खरगे यांच्याविरोधात वॉरंट जारी

चंदीगड : पंजाबमधील संगरूर जिल्हा न्यायालयाने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याविरोधात वॉरंट जारी केले आहे. त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ सप्टेंबर रोजी होणार आहे.

https://prahaar.in/2026/07/29/ban-on-the-sale-of-junk-food-including-items-high-in-fat-salt-and-sugar-within-school-premises-directives-issued-by-the-food-and-drug-administration/

खरगे यांचे वकील एडवोकेट ललित गर्ग यांनी सांगितले की, हे प्रकरण २०२३ मधील असून, संगरूर येथील रहिवासी हितेश भारद्वाज (बजरंग दल सदस्य) यांनी खरगे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. खरगे यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात बजरंग दलावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी बजरंग दलाची तुलना पाकिस्तानी दहशतवादी संघटना पीएफआयशी केली होती आणि सत्तेत आल्यास या संघटनेवर बंदी घालण्याचे सांगितले होते.पूर्वी हे प्रकरण दिवाणी स्वरूपाचे होते, ज्यामध्ये मल्लिकार्जुन खरगे यांचे वकील न्यायालयात हजर झाले होते. आता न्यायालयाने हे प्रकरण फौजदारी स्वरूपाचे केले आहे. जर खरगे या प्रकरणात न्यायालयात हजर झाले नाहीत, तर न्यायालय त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंटही जारी करू शकते. या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ सप्टेंबर रोजी निश्चित करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here